How To Use Banana Peel: अनेक आजार व समस्यांवर सर्वात सोपा व स्वस्त उपाय म्हणजे केळी. आजवर आपण अनेकदा केळ्याचे फायदे ऐकले असतील. पोटॅशियमचा समृद्ध स्रोत असणाऱ्या केळ्यांमध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का, की केवळ केळीचा गरच नव्हे तर तिच्या सालीमध्येही अनेक पोषकसत्व असतात. अगदी त्वचा, केस, पोट ते तुमच्या घरातील बाग सर्वत्र तुम्ही या केळीचं सालींचा वापर करू शकता. आजच्या या लेखात आपण केळीचे साल कसे वापरावे व त्यामुळे तुम्हाला काय फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात आधी आपण केळीच्या सालीचा तुमच्या शरीरासाठी कसा वापर करता येईल हे पाहूया…

१) केळ्यांमध्ये पोटॅशियम असते हे आपण जाणता पण केळीच्या सालीमध्येही पोटॅशियमचा मुबलक साठा असतो हे तुम्हाला माहितेय का? शिवाय या सालींमधे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात जे त्वचेला लावल्यास कमी वयात सुरकुरत्या येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

२) केळीची साल दातावर घासल्यास दातावरील पिवळे घट्ट थर दुर होऊ शकतात.

३) केळीची साल ही त्वचेवर मॉइश्चरायजर म्हणून सुद्धा काम करू शकते. तुमची त्वचा कोरडी असेल तर त्यावर केळीची साल चोळू शकता.

आता आपण केळीच्या सालीचा तुमच्या घराला कसा फायदा होईल हे पाहूया..

१) गरम पाण्यात केळीची साल टाकून उकळून घ्या व हेच पाणी तुमच्या घरातील रोपांना टाका यामुळे त्यांना मुबलक प्रमाणात पोषण मिळू शकते. केळीची साल शक्यतो अशीच कुंडीत टाकणे टाळा कारण यामुळे कीटक व माशा वाढू शकतात.

२) केळीची साल जर तुम्हाला थेट खत स्वरूपात वापरायची असेल तर कुंडीतील थोडी माती उकरून वर काढा व त्यात केळीची साल टाकून मग पुन्हा मातीने झाका यामुळे काहीच दिवसात तुम्ही सैन्द्रिय पद्धतीने खत तयार करू शकता.

३) केळीची साल व्हिनेगरमध्ये घालून तुम्ही घरातील काचा व नळ स्वच्छ करू शकता.

हे ही वाचा<< रात्री झोपण्याआधी नाकात तुपाचे 2 थेंब घालण्याचे चमत्कारिक फायदे वाचा; काय आहे योग्य पद्धत?

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. तुम्ही स्वच्छतेसाठी केळीची साल वापरताना ग्लोव्ह्ज घालून आवश्यक ती काळजी घ्या. शिवाय त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुद्धा हिताचे ठरेल)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never throw banana peel use it to clean skin and home how to make compost fertilizer save your money with jugadu tips svs
Show comments