बजाज ऑटोने प्लॅटिनाचं 110 cc मॉडेल लाँच केलं आहे. दिल्ली एक्स शोरुममध्ये 49 हजार 300 रुपये इतकी या बाइकची किंमत ठेवण्यात आलीये. हिरो पॅशन प्रो 110, होंडा सीडी 110 ड्रिम डीएक्स आणि TVS Radeon यांसारख्या बाइक्सला प्लॅटिनाकडून आव्हान मिळणार आहे.
ट्युबलेस टायर, ड्युअल स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग, नाइट्रोक्स शॉक अब्जॉर्बर्स आणि अँटी-स्किड ब्रेक यांसारख्या शानदार फिचर्ससह नवी प्लॅटिना कंपनीने बाजारात उतरवली आहे. 50 हजाराहून कमी किंमत असलेल्या कोणत्याही बाइकमध्ये पहिल्यांदाच इतके फिचर देण्यात आलेत.
नव्या प्लॅटिनामध्ये 4-स्पीड गिअरबॉक्ससह 115cc का सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 7000 rpm वर 8.4 bhp ची पावर आणि 5000 rpm वर 9.81 Nm टॉर्क जनरेट करतं. याच्या पुढील बाजूला 135 mm टेलेस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस नाइट्रोक्स शॉक अब्जॉर्बर्ससह 110 mm स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आलंय. स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेंशनमुळे खराब रस्त्यांवरही जास्त धक्के जाणवणार नाहीत आरामात प्रवास करता येईल.
ब्रेकिंगबाबत बोलायचं झाल्यास नव्या प्लॅटिनाच्या पुढील बाजूला 130 mm आणि मागील बाजूला 110 mm ड्रम ब्रेक देण्यात आलेत. बाइकमध्ये CBS म्हणजे काम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम आहे. मायलेजच्या बाबतीत ही बाइक जुन्या प्लॅटिनाप्रमाणेच उत्तम असेल असं सांगितलं जात आहे.
नव्या प्लॅटिनाच्या स्टाइलमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाहीये. मात्र, फ्रेश लुक दिसावं यासाठी कंपनीने यामध्ये स्पोर्टी आणि बोल्ड दिसणारे नवे बॉडी ग्राफिक्स दिलेत. ग्रे डेकल्ससह इबोनी ब्लॅक, ब्ल्यू डेकल्ससह इबोनी ब्लॅक आणि कॉकटेल वाइन रेड कलर्समध्ये ही बाइक उपलब्ध असेल.