मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आता वापरकर्त्यांसाठी एक नविन फिचर आणले आहे. आता आपले ट्विट युजर्सना त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्येही शेअर करता येणार आहे. या नव्या फिचरची तपासणी ट्विटर गेल्या वर्षापासून करत होते. जे लोक नियमितपणे त्यांचे ट्विट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर करतात त्यांच्यासाठी हे नवीन अपडेट कोणत्याही भेटीपेक्षा कमी नसणार आहे. या फिचरच्या येण्यापूर्वी ट्विटर युजर्स आपल्या ट्विटचे स्क्रीनशॉट इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत होते.

ट्विटरचे हे नवीन अपडेट फिचर सध्या केवळ ios वापरकर्त्यांसाठी आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना यासाठी बराच काळ थांबावे लागणार आहे. त्यामुळे ios सिस्टम असणाऱ्या वापकर्त्यांना हे नविन फिचर तात्काळ वापरता येणार आहे.

कसे मिळवाल हे नविन फिचर

तुम्हालाही जर ट्विटरचे हे नवीन फिचर वापरण्याची इच्छा असल्यास पहिल्यांदा तुमचे ट्विटर अ‍ॅप करा. त्यानंतर जे ट्विट इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करायचे त्याच्या शेअर बटणावर क्लिक करा आणि नंतर इंस्टाग्रामचा पर्याय निवडा.

रोजगाराची नवी संधी… Instagram Reels च्या माध्यमातून करता येणार कमाई

ट्विटरवर इंस्टाग्राम निवडल्यानंतर ते ट्विट इंस्टाग्राम अॅपमधील स्टोरीजमधील ड्राफ्टमध्ये सेव्ह होईल. त्यानंतर आपण इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडून स्टोरी पब्लिश करू शकता. पब्लिश करण्यापूर्वी आपण त्यात स्टिकर किंवा काही ओळीदेखील देखील जोडू शकता. त्यानंतर तुमचे ट्विट हे तुमच्या इन्स्टा स्टोरीवर तुम्हाला पाहायला मिळेल. इन्स्टाग्राममध्ये पोस्ट केलेल्या ट्विटवर क्लिक करून, कोणीही ट्विटरवर जाऊ शकत नाही. या व्यतिरिक्त आपण इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये प्रोटेक्टेड ट्विट देखील शेअर करू शकत नाही.

दरम्यान, ट्विटर आणखी एक नविन फिचर लवकरत जाहीर करणार आहे. ट्विटरच्या नव्या अपडेट नंतर आपण स्वतः निश्चित करु शकता की ट्विटवर कोण रिप्लाय करु शकतो आणि कोण नाही. म्हणजे ट्विट केल्यानंतर युजरला फिल्टरचा पर्याय मिळणार आहे. अद्याप हे फिचर कधीपर्यंत याबाबात कोणतीही माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही.

Story img Loader