महिलांना त्या गर्भवती आहेत का, याबद्दल माहिती देणाऱया आणि घरातल्या घरात करता येणाऱया चाचणीचा आता भारतासह वेगवेगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. आता या चाचणीमधून गर्भधारणेला किती आठवडे झाले, हे देखील महिलांना कळू शकणार आहे. अमेरिकेमध्ये नुकतीच या स्वरुपाच्या चाचणीला सुरुवात झाली. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने या स्वरुपाच्या चाचणीला हिरवा कंदील दाखवला. युरोप खंडामध्ये ही चाचणी याआधीच सुरू झाली आहे. ‘क्लिअर ब्ल्यू ऍडव्हान्सड प्रेगन्सी टेस्ट’ असे या चाचणीचे नाव आहे….
गर्भधारणा झाल्यानंतर महिलांच्या लघवीमध्ये एचसीजी हार्मोन आढळतात. या हार्मोनमुळेच महिलांच्या लघवीची तपासणी केल्यावर त्यातून त्या गर्भवती आहेत का, हे कळू शकते. आता संबंधित महिला गर्भवती आहे की नाही, हे कळण्याबरोबरच जर ती गर्भवती असेल, तर गर्भधारणेला किती आठवडे झाले, हे देखील या चाचणीच्या माध्यमातून कळू शकणार आहे. संबंधित महिलेच्या लघवीतील एचसीजी हार्मोनच्या प्रमाणावरून गर्भधारणेला किती आठवडे झाले, हे कळू शकणार आहे. या चाचणीसाठी वापरण्यात येणाऱया स्ट्रीपमधूनच गर्भधारणेला किती आठवडे झाले हे कळू शकेल. गर्भधारणेला १-२ आठवडे, २-३ आठवडे किंवा ३ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. हे महिलांना या चाचणीतून कळू शकणार आहे.

Story img Loader