देशातील अग्रगण्य कार कंपनी मारुती सुझुकी एक नवी कार आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या वॅगन आर या कारवर आधारित ही कार असणार आहे. पुढील महिन्यात कंपनीकडून ही नवीन सात आसनी कार लाँच केली जाणार असून ही कार एमपीव्ही (मल्टी पर्पज् व्हेईकल)  प्रकारातील असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सात आसनी कारची अथवा नवीन वॅगन आरची एक्सक्लुजिवपणे प्रीमीयम नेक्सा डिलरशीपद्वारे विक्री करण्यात येईल. मारुतीला ही कार प्रीमियम ऑफर म्हणून बाजारात उतरवण्याची इच्छा आहे. त्यामुळेच कंपनीने आपल्या एरेना शोरुमऐवजी नेक्साद्वारे बाजारात उतरवणार आहे. भारतीय बाजारात या सात आसनी कारची स्पर्धा दस्तून गो प्लस आणि रेनॉची नवीन कार ‘ट्राइबर’सह होऊ शकते.

मारुती सुझुकीच्या सात आसनी MPV मध्ये 1.2 लिटर, 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. याच इंजिनाचा वापर कंपनीकडून वॅगन आर हॅचबॅक मध्ये करण्यात आला आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 82bhp पावर आणि 4,200 rpm वर 113Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गिअरबॉक्स असण्याची शक्यता आहे. या सात आसनी कारचं नाव ‘वॅगन आर’ असणार की अन्य काही, आणि या कारची किंमत किती असू शकते याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New maruti wagon r seven seater mpv in the works