गर्भाशयाचा कर्करोग बळावण्यापूर्वी त्याचे निदान करणारे नवे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसीत केले आहे. सध्या गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची पुष्टी करणारी तंत्र नव्हते. तसेच गर्भाशयाचा कर्करोग होण्याची तशी काही विशिष्ट लक्षणेही नाहीत. त्यामुळे रोग पहिल्या अवस्थेत असताना लक्षात येत नव्हते. तो बळावला की, त्याची पुष्टी होत होती. त्यामुळे हा रोग अतिशय घातक आहे, कारण बहुतेक महिलांच्या तपासणी दरम्यान हा रोग बळावलेला असताना त्याची पुष्टी झाल्याचे निरीक्षणात आढळून येत होते. आता या नव्या स्क्रिनिंग तंत्रज्ञानामुळे रोगाची पहिल्या चाचणीतच पुष्टी होण्याची शक्यता आहे.
टेक्सास एमडी अँडरसन कर्करोग सेंटर विद्यापीठाच्या कारेन लू यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शास्त्रज्ञांनी स्क्रिनिंग तंत्रज्ञानात गर्भाशयाच्या कर्करोगाचे तीन टप्पे समाविष्ट केले आहेत.
यानुसार सीए१२५ ही रक्तचाचणी करावी लागते. त्यावर गर्भाशयाच्या कर्करोगाचे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. हे टप्पे ‘गर्भाशय कर्करोगाच्या प्रमाणाचा धोका’ (Risk of Ovarian Cancer Algorithm) यामुद्यांवर प्रमाणावर आधारभूत आहेत. एका वर्षात दोन वेळा सीए१२५ रक्त चाचणी करावी लागत असल्यास रोग पहिल्या टप्प्यात, ज्यांना प्रत्येक तीन महिन्यांनी चाचणी करावी लागेल ते रोगाच्या दुसऱया टप्प्यात, तर यापलीकडे ज्यांना अल्ट्रासाऊंड चाचणीला सामोरे जावे लागेल त्यांचा कर्करोग बळावलेला असेल.
एकूण गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या महिलांपैकी ५.८ टक्के महिला दुसऱया टप्प्यात असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार त्यांना दर तीन महिन्यांनी सीए१२५ चाचणी करावी लागेल.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा