स्वमग्नता असलेल्या मुलांना नाकावाटे ऑक्सिटोसिनचा एक फवारा दिला, तरी त्यांच्या मेंदूचे कार्य सुधारत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. येल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी म्हटले आहे की, स्वमग्नता विकार असलेल्या मुलांना ऑक्सिटोसिन नाकावाटे दिले तर त्यांची सामाजिक माहिती प्रक्रिया सुधारते. मुलांमधील मेंदूचे कार्य व ऑक्सिटोसिन यांचा संबंध प्रथमच जोडला गेला आहे असे येल विद्यापीठाचे बाल अभ्यास विषयाचे सहायक प्राध्यापक इलनिट गॉर्डन यांनी सांगितले. स्वमग्नता असलेल्या १७ मुलांवर ऑक्सिटोसिनचा परिणाम तपासण्यात आला. ८ ते १६.५ वयोगटातील मुलांचा यात समावेश करून काहींना खोटा म्हणजे औषध नसलेला फवारा देण्यात आला तर काहींना ऑक्सिटोसिनचा फवारा देण्यात आला. त्यात ज्यांना ऑक्सिटोसिनचा फवारा दिला त्या मुलांची सामाजिक कौशल्ये सुधारल्याचे दिसून आले. ऑक्सिटोसिन हे मेंदूत होणारे नैसर्गिक संप्रेरक असून ते नंतर शरीरात पसरते. ज्या मुलांना हे संप्रेरक नाकावाटे दिले त्यांच्यात भावना ओळख व इतर भागांशी संबंधित कार्ये सुधारलेली
दिसली. जर्नल प्रोसिडिंग ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा