हृद्यविकार आणि स्ट्रोकयेणे यासारख्या विकारांना कारणीभूत ठरणाऱया रक्तातील गाठी ओळणारी नवी मूत्र चाचणी विकसीत करण्यात आली आहे.
संशोधक संगिता एन.भाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्त गोठण्याच्या क्रियेत तयार होणाऱया अविद्रव्य प्रथिनांचा या चाचणीव्दारे शोध घेता येईल. सामान्यत: जखम झाल्यानंतर रक्त गोठणे चांगले असते त्याने रक्तस्त्राव होत नाही. परंतु, काही बाबतीत रक्तगोठणे शरिरासाठी हानिकारक ठरते. हृदय किंवा मेंदूच्या बाबतीत अशा रक्ताच्या गाठी येणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे रक्तपुरवठ्यात अडचणी तसेच हृद्यविकार संभवतो.
त्यामुळे या गाठींचा शोध घेण्यासाठी सोप्या परिक्षणाची गरज होती. त्यानुसार संशोधकांच्या सुरू असलेल्या अभ्यासात साध्या मूत्र चाचणीतून शरीरातील रक्ताच्या गाठींचा शोध घेता येत असल्याचे आढळले आहे.
आणखी वाचा