नवं वर्षाच्या आगमनाची अनेक जण आतुरतेने वाट बघत आहे. नव्या वर्षासाठी नवे संकल्प आणि नव्या योजना आखल्या आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आता काही दिवसांचा अवधी राहिला असून संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र अनेकदा अपूर्ण संकल्पासाठी नशिबाला दोष दिला जातो. करोना काळात तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. त्यामुळे नवं वर्ष तरी चांगलं जावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चार राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप शुभ आणि चांगले फळ देणारे असणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळणार आहे.
मेष: ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष २०२२ मेष राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. मंगळाच्या संक्रमणामुळे जवळपास सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचा कालावधी आहे. कारण मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन योजना केल्यानंतर वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. परंतु जसजसे वर्ष २०२२ पुढे जाईल तसतसे तुमच्या समस्या कमी होतील. तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.
वृषभ: ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष २०२२ वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. नवीन वर्षाच्या पूर्वार्धात तुमच्या राशीच्या नवव्या भावात शनिचे भ्रमण होणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. माता लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या राशीत बदलामुळे तुम्हाला वेळोवेळी लाभ मिळत राहतील. कारण शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे. वर्षाच्या शेवटी सरकारी नोकरीच्या इच्छा पूर्ण होण्याची जोरदार चिन्हे आहेत. जे व्यवसायिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनाही चांगला नफा मिळेल.
Astrology 2021: शुक्राची वक्री चाल सुरु; ‘या’ राशींच्या लोकांना जाणवणार प्रभाव
सिंह: या राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन उत्तम असणार आहे. कमाईच्या अनेक उत्तम संधी मिळतील. नशिबाची साथ असल्याने प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिंकू शकाल. प्रवासातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. जेव्हा सूर्य ग्रहाची राशी बदलते तेव्हा तुम्हाला एखाद्या चांगल्या पॅकेजची नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. तसेच व्यवसाय करणाऱ्यांसाठी एप्रिल महिन्यानंतर परिस्थिती बदलू शकते. नवीन काम सुरू करू शकता.
वृश्चिक: या राशीच्या लोकांची आर्थिक गाडी रुळावर आलेली असेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर बॉस खूश होतील. जेव्हा मंगळाच्या राशीत बदल होईल तेव्हा तुम्हाला फायदा होईल. तुमचा पगार वाढू शकतो. नवीन वर्षात लाभाचे संकेत आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जे नोकरी करत आहेत, त्यांना करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. तसेच पगार वाढण्याची दाट शक्यता आहे.