Top 5 offbeat destinations in India for New Year celebration: नववर्षाच्या सुट्टीसाठी अनेक लोक गर्दी असलेल्या ठिकाणी जातात, तर काहींना ऑफबीट ठिकाणी म्हणजेच कमी गर्दी असलेल्या, वेगळ्या ठिकाणांवर जायला आवडते. जर तुम्ही देखील दुसऱ्या गटात मोडत असाल, तर तुम्हाला भारतातील या ऑफबीट ठिकाणांना जरूर भेट द्यायला हवी.
नवीन वर्ष २०२५: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतातील टॉप ५ ऑफबीट ठिकाणे
कसोल (Kasol)
जर तुम्हाला हिमाचल प्रदेशच्या सुंदर, वेगळ्या ठिकाणी नववर्ष साजरे करायचं असेल, तर तुम्ही कसोलला जाऊ शकता. शिमला आणि कुल्लू-मनालीच्या गदारोळापासून दूर असलेल्या कसोलमध्ये तुम्ही अगदी आनंदात पार्टी करू शकता. बर्फाने झाकलेले उंच पर्वत, दाट जंगलं, तलाव आणि धबधबे कसोलच्या सुंदरतेत भर घालतात. कसोलला भारताचं ‘मिनी इस्रायल’ असंही म्हटलं जातं, कारण इथे तुम्हाला स्वादिष्ट इस्रायली जेवण मिळू शकतं. इथे तुम्ही एक रूम बुक करून रात्री पार्टी करू शकता आणि कोणतीही अडचण येणार नाही.
हेही वाचा… केसातील कोंडा होईल दूर आणि केस गळतीही थांबेल, घरातील ‘ही’ गोष्ट एकदा वापरून बघाच, पैसे वाचवणारा उपाय
बिनसर (Binsar)
उत्तराखंडच्या सुंदर व्हॅलीमध्ये अनेक अशा सुंदर, वेगळ्या ठिकाणांवर जाऊन भेट देणे खूप मजेदार असते. पण जर तुम्हाला नववर्ष साजरे करण्यासाठी एक उत्तम, वेगळं ठिकाण पाहिजे असेल, तर तुम्ही बिनसरला जाऊ शकता. हे समुद्रसपाटीपासून २ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे आणि इथे शांततेचा आणि पार्टीचा अशा दोन्हीचा अनुभव घेता येतो. इथे असलेल्या कुटी, होमस्टे किंवा कॅम्पमध्ये रूम बुक करून तुम्ही शानदार आणि धमाकेदार पार्टी करू शकता. बिनसरमध्ये नववर्षाची पार्टी केल्यानंतर, तुम्ही बिनेश्वर मंदिर, झिरो पॉइंट आणि जलना अशा अद्भुत ठिकाणांचीही सफर करू शकता.
अगुंबे (Agumbe)
जर तुम्हाला दक्षिण भारतात एक उत्तम आणि वेगळ्या ठिकाणी नववर्षाची पार्टी करायची असेल, तर तुम्ही आगुम्बे ला जाऊ शकता. कर्नाटकमधील अगुंबे ‘दक्षिणेचं चेरापूंजी’ म्हणून ओळखलं जातं. हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. अगुंबे त्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे आणि पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच, अगुंबे साहसी पर्यटकांसाठी देखील खूप लोकप्रिय आहे. इथे तुम्ही सूर्योदय आणि सुर्यास्ताचे अप्रतिम दृश्य पाहू शकता. इथे असलेला बारकना धबधबा देशातील दहावा सर्वात उंच धबधबा मानला जातो.
हेही वाचा… गिझरचा स्फोट होऊन नववधूचा मृत्यू! असा भयंकर अपघात टाळण्यासाठी ‘या’ सामान्य चुका टाळा
पेलिंग (Pelling)
जर तुम्हाला उत्तरपूर्व भारतातील एका सुंदर आणि लोकप्रिय ठिकाणी नववर्षाची पार्टी साजरी करायची असेल, तर तुम्ही दार्जिलिंग किंवा गंगटोक ऐवजी पेलिंगला जाऊ शकता. पेलिंग हे सिक्किममधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. भारतीय पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकदेखील पेलिंगमध्ये नववर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी येतात. असं सांगितलं जातं की, पेलिंगमधील अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये संपूर्ण रात्रभर न्यू इयर पार्टी होते. पेलिंगमधील काही ठिकाणी नववर्षाच्या विशेष दिवशी डान्स आणि गाण्याचीही व्यवस्था असते. इथे तुम्ही मित्रांसोबत एक संस्मरणीय पार्टी करू शकता.
गणपतीपुळे
महाराष्ट्रात नववर्ष साजरे करण्याची गोष्ट आली, की अनेक लोक पहिल्यांदा मुंबईचं नाव घेतात. पण जर तुम्हाला मुंबईच्या गदारोळापासून दूर, महाराष्ट्रातील एक सुंदर आणि वेगळ्या ठिकाणी नववर्षाची पार्टी साजरी करायची असेल, तर तुम्ही गणपतीपुळेला जाऊ शकता. हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे आणि त्याच्या सुंदरतेसह पार्टीसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही गणपतीपुळे बीचच्या किनाऱ्यावर एक संस्मरणीय पार्टी साजरी करू शकता. इथे असलेल्या ४०० वर्ष जुन्या गणेश मंदिरालाही तुम्ही भेट देऊ शकता.