साल २०१८ अवघ्या चार दिवसांत निरोप घेणार आहे. सरत्या वर्षांचा निरोप आणि नववर्षांचे स्वागत याच्या तयारीत सगळेच लागले असल्याने सध्या सर्वत्र जल्लोषाचा माहोल आहे. नवीन वर्षाची सुरुवात करताना प्रत्येकाला येणार वर्षे सुखाच आणि समृद्धीन जावं अशी आशा असते.परंतु आपल्या हातून कळत नकळत अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे नववर्ष साजरे करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहीजेत. जाणून घेऊयात काय काळजी घ्यावी….
२०१८ चा निरोप देताना किंवा नववर्षाच्या स्वागतावेळी मद्यपान करून वाहन चालवू नका.
नववर्षाच्या स्वागतासाठी वाहन घेऊन घराबाहेर पडणार असाल तर वाहन परवाना तसेच पी.यू.सी. सोबत घेऊन निघा.
नवीन वर्षाच्या स्वगातला फटाक्यांची आतिषबाजी करू नये. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच शिवाय निघणाऱ्या धुरामुळे श्वासनाचे आजार होऊ शकतात.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
नववर्षामुळे बाहेर देशातील पर्यटक आपल्या शहरात भेट देण्यासाठी, फिरण्यासाठी येत असतात. त्यांना चुकीची वागणूक देऊ नका.
रात्री उशीरा पर्यन्त बाहेर फिरू नका. सद्या थंडीचे दिवस असल्याने हवामान मानवले नाही तर आजारी पडण्याची दाट शक्यता असते.