Happy New Year 2025 Wishes : बघता बघता २०२४ वर्ष संपले, हे वर्ष कधी आले कधी गेले हे कळलेच नाही. सुखाच्या दुःखाच्या, आनंदाच्या, विरहाच्या अनेक आठवणी ठेऊन हे वर्ष निघून गेले. नवे वर्ष म्हटल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागण्याचा संकल्प तुम्ही केला असेल. हे वर्ष जास्तीत जास्त आनंदाने, प्रियजनांच्या सहसावात, प्रगती आणि भरभराटीने जावे अशी सर्वांची इच्छा असते. याच गोष्टी मनात ठेऊन आपण आपल्या आप्तेष्टांचेही हित चिंतत असतो. सरत्या वर्षाची संध्याकाळ आणि नवीन वर्षाची पहाट आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत कुणाला घालवायला आवडणार नाही. त्या दृष्टीने बहुतेक जण नियोजन पण करीत असतील परंतु ज्यांच्या काही जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून दूर देखील राहत असतील. त्यांना आपण फोनकरुन किंवा एसएमएस करुन शुभेच्छा देणे अगत्याचे आहे. मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे असे आपण जरुर सांगू शकतो. काही लोकांची आठवण आपण रोज काढत नाही हे सत्य आहे परंतु जेव्हा त्या व्यक्ती समोर येतात तेव्हा आपण एकमेकांना विसरलो हे कधी पटतच नाही. अशा सर्व नातेवाईक, मित्रांना शुभेच्छा पाठवा आणि तुमच्या जीवनात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे याची जाणीव करुन द्या.
मित्र-नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतील खास Whatsapp Messages, हटके HD फोटो, Status
सर्वांच्या हृदयात असू दे प्रेमाची भावना
नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी
हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक
गरिबांना मिळू दे अन्न, वस्त्र आणि निवारा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपू या
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,
नव्या आशा, नवी उमेद व नावीन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू.
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे आपल नातं असंच राहू दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2024 या वर्षाचा
2025 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप मेसेज | Happy New Year 2025 Messages In Marathi
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले 2025 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या या वर्षी आकाशी रंग उधळले नवे,
प्रत्येक क्षण साठव मनात होऊ दे त्यांचे थवे
येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी
तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या दिनी
पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
प्रत्येक दिवस सुंदर अन् रात्र उज्ज्वल… खास व्यक्तींना द्या नवीन वर्षाच्या भन्नाट शुभेच्छा
नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना!
31 तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात
भरपूर काम करा…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख-दुःखं झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाच्या द्या मराठीतून या खास शुभेच्छा, पहा New Year Wishes Images, Whatsaap Messages Quotes in Marathi
घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभ दिनी!
2025….
नवीन वर्ष आपणा सर्वांस
सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो!
नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश,
नशिबाची दारं उघडावीत,
देव राहो तुमच्यावर प्रसन्न,
हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. नववर्षाभिनंदन!
दुःखं सारी विसरून जाऊ ..
सुखं देवाच्या चरणी वाहू …
स्वप्नं उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेनं नव्यानं पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरुवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025!