Newspaper hack : जुने वृत्तपत्र आपण कचरा समजून आपण नेहमी ते रद्दी विक्रेत्याला विकतो, पण तुम्हाला माहितीये का जुन्या वृत्तपत्राचा आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. फ्रिजमध्ये वर्तमानपत्र ठेवण्यामुळे खूप फायदा होऊ शकतो. अनेकदा आपण फ्रिज साफ करण्यासाठी महागडे क्लिनर वापरतो पण तरीही फ्रिजमधून येणारा दुर्गंध काही कमी होत नाही. पण वर्तमानपत्राच्या मदतीने फ्रीजमधून येणारा दुर्गंध रोखू शकता, कसे ते जाणून घ्या.
वर्तमानपत्र फ्रिजमध्ये ठेवताच गायब होईल दुर्गंधी
जर तुमच्या फ्रीजला दुर्गंधी येत असेल तर रद्दी वर्तमानपत्राचा वापर करू शकता. त्यासाठी प्रथम जुने वर्तमानपत्र घ्या आणि एका वाडग्यात पाणी घ्या. कागदाचा गोळा करून त्या पाण्यात भिजवा आणि पाणी पिळून घ्या, मग ते फ्रीजमध्ये ठेवा. या हॅकच्या मदतीने तुम्ही फ्रीजमधून येणारा वास दूर करू शकता.
असाही करू शकता वृत्तपत्राचा वापर
बाजारातून आणलेल्या भाज्या अनेकदा नासतात. बाजारातून भाज्या आणल्या की त्याची माती धुवून काढा. भाजी चांगली सुकवा आणि निवडून पेपरमध्ये गुंडाळून मग फ्रिजमध्ये ठेवा. पंधरा दिवसर भाज्या चांगल्या राहतील.
कोथिंबीर व्यवस्थित सुकवण्यासाठी देखील जुने वृत्तपत्र वापरू शकता. बाजारतून कोथिंबीर आणली की आपण स्वच्छ धूवून आणि निवडून ठेवतो. अशावेळी झटपट कोथिंबीर वापरण्यासाठी तुम्ही रद्दी वृत्तपत्र वापरू शकता. एका वृत्तपत्राच्या पानावर कोथिंबीर पसरा त्यावर दुसरा पानाने झाका. त्यातील पाणी किंवा ओलावा झटपट निघून जाईल. तुम्ही ते वृत्तपत्र गोळा करून फ्रिजमध्ये ठेवा.
तसेच लसून ठेवण्यासाठी किंवा मिरच्या ठेवण्यासाठी तुम्ही वृत्तपत्र वापरू शकता. तुम्ही एका डब्यात वृत्तपत्राचा कागद ठेवा आणि त्यात मिरची किंवा लसून ठेवा डब्याला झाकण लावून त्याला झाकण लावून मग फ्रिजमध्ये ठेवा.
आरसा साफ करण्यासाठी देखील तुम्ही वृत्तपत्राचा वापर करू शकता. आरसा किंवा काच चकचकीत साफ होईल.
बाथरुमध्ये केस अडकून राहतात. अशावेळी ते साफ करण्यासाठी तुम्ही वृत्तपत्र वापरू शकता
भांडी धुताना जर ताटामध्ये अन्न शिल्लक असेल तर तुम्ही पेपरने ते साफ करून कचऱ्यात टाकू शकता. ताट स्वच्छ होईल पण सिंकमध्ये करखटे अन्न अडकणार नाही.
स्वयंपाक करताना तेल सांडल्यास आधी वृत्तपत्राने साफ करून घ्या मग ते पावडर टाकून कापडाने पुसून घ्या.
वृत्तपत्राचे हे हॅक्स वापरून पाहा. maa, yeh kaise karun? नावाच्या युट्युब अकांऊटवर शेअर केला आहे.