केंद्र सरकारने इंटनरेटवरील ८५७ ‘पोर्न’ साईटसवर बंदी घालण्याचा निर्णय अनेकजणांना रूचलेला दिसत नाही. कारण, त्यानंतर लगेचच वेगवेगळ्या सोशल साईटसवरून सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवणारे अनेक संदेश फिरताना दिसत आहेत. सोशल कट्ट्यावरील हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या ट्विटरवरदेखील अपेक्षेप्रमाणे या सगळ्याच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा दाखल देत आम्ही हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी ट्विटरकरांनी या सगळ्याबद्दल नापसंती दर्शविल्याचे दिसते. जे भारतीय संस्कृतीला धरून नाही त्या गोष्टींवर बंदी घालण्याची एकंदर भूमिका सरकारकने गेल्या काही काळात घेतलेली दिसते. त्यामुळेच आता भविष्यात सरकारला कोणत्या गोष्टींवर बंदी घालता येईल, यासाठीचे काही मजेशीर पर्याय ट्विटरकरांकडून सरकारला सुचविण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in