दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीय. बऱ्याच लोकांनी दिवाळीसाठी वेगवेगळी खरेदी सुद्धा केली असेल. पण तुमच्या चेहऱ्याचं काय? दिवाळीच्या धावपळीत तुम्हाला पार्लर किंवा सलूनमध्ये जाण्यासाठी वेळही मिळाला नसेल. तसंच पार्लर आणि सलूनमध्ये ट्रीटमेंटसाठीचा खर्च देखील परवडणारा नसतो. पण तुम्ही घरच्या घरी उपाय करून तुमच्या चेहऱ्यावर फेस्टीव्ह ग्लो आणू शकता. काय आहे नक्की तो उपाय जाणून घेऊयात….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या वाईट सवयींमुळे चेहरा निर्जीव आणि कोरडा होतो. बरेच लोक दिवसा आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात. पण रात्री त्याकडे दुर्लक्ष करून झोपी जातात. या सवयी आपल्या चेहऱ्यासाठी खूप हानिकारक असल्याचं सिद्ध झालंय. रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने ती चमकते आणि निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत, ज्या तुम्ही रोज झोपण्यापूर्वी वापरल्या तर तुमची त्वचा सकाळी मऊ आणि चमकदार होईल. या टिप्स दररोज वापरल्या तर येत्या दिवाळीपर्यंत तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फेस्टीव्ह ग्लो आणू शकता. त्यासाठी आतापासूनच उपाय सुरू करा.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर दूध लावा : चेहऱ्यावर दुधाचा वापर केल्याने तुम्ही सहज चमकणारा आणि मुलायम चेहरा मिळवू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर दूध लावा. जर तुम्ही दूध लावून थोडा वेळ मालिश केली तर ते चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतर तुम्ही झोपी जा आणि सकाळी उठून स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहरा सुंदर बनवण्यासोबतच दूध चेहऱ्याची नैसर्गिक ओलावाही राखतो.

चेहऱ्यावरील घाण फेसवॉशने साफ करा : दिवसभर बाहेरील धूळ चेहऱ्यावर साचते. केवळ पाण्याने धुवून ही घाण पूर्णपणे निघून जात नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहऱ्याला फेसवॉश लावा. यामुळे चेहऱ्यावरील घाण पूर्णपणे साफ होते.

फेस वॉश नंतर फेस वॉश करा
मॉइश्चराइज- फेस वॉश लावल्यानंतर लगेचच चेहऱ्याला मॉइश्चराइज करायला विसरू नका. यासाठी चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरावे. यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक ओलावा टिकून राहून चेहऱ्याला पोषकता राहते.

मध देखील चेहऱ्याला देईल ग्लो- मधाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील घाण साफ करून तो ग्लोइंग करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी चेहऱ्यावर मध लावा आणि अर्धा तास सुकण्यासाठी सोडा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून झोपा.

नियमित अंतराने बेडशीट आणि उशाचे कव्हर बदला- निरोगी चेहऱ्यासाठी चेहरा स्वच्छ करण्याबरोबरच झोपण्याच्या क्षेत्राच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. उशी कव्हर आणि बेडशीट नियमित अंतराने धुवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night skincare routine use milk on your face before going to sleep at night these beauty tips are also helpful prp