करोनाच्या संसर्गाचा सामना करत असताना आता कुठेतरी कोविडचे रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशातच आता सर्व सामन्यांच्या चिंतेत भर घालणारी आणखीन बातमी समोर आलीय. महराष्ट्रात पहिल्यांदाच निपाह व्हायरस आढळून आलाय. सातारा जिल्ह्यातील महबळेश्वर येथील गुहेतील दोन वटवाघूळांना निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये महाबळेश्वरमधील वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘निपाह’ व्हायरस आढळून आलाय. एनआयव्हीच्या संशोधकांनी ‘जर्नल ऑफ इन्फेक्शन आणि पब्लिक हेल्थ’ मध्ये याबाबत माहिती दिली आहे. हा विषाणू सर्वप्रथम कुठं आढळला? त्याची लागण कशी होते आणि त्यावर उपचार कसे केले जातात, याबद्दल जाणून घेऊयात….
निपाह विषाणू सर्वात प्रथम कुठे सापडला ?
भारतात या पूर्वी हा व्हायरस २००१ मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे निपाह विषाणू सापडला होता. त्यावेळी निपाहची लागण झालेले एकूण ६६ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रुग्णांचा मृत्यु झाला होता. तर पुन्हा २००७ मध्ये पश्चिम बंगाल येथील नादिया येथे निपाहाचे ५ रुग्ण आढळले होते. या पाचही ५ रुग्णांचा मृत्यु झाला होता.
निपाहाची लक्षणे :
> प्रचंड ताप येणे
> डोकेदुखी
> स्नायू दुखी
> उलट्या होणे
> मन आखडणे
> प्रकाशाची भीती वाटणे
> मानसिक गोंधळ
> छातीत जळजळणे
> चक्कर येणे
> बेशुद्ध पडणे
वटवाघुळ हे या विषाणूची नैसर्गिक वाहक आहे.
निपाह व्हायरसची लागण काशी होते ?
वटवाघूळ हा नैसर्गिक वाहक असल्याने वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच, एखाद्या व्यक्तीला निपाह विषाणूचा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तीला देखील याचा संसर्ग होऊ शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हा व्हायरस संसर्ग झालेली वटवाघूळ आणि डुकरांच्या माध्यमातून मानवाला संसर्ग करु शकतो. अशी माहिती दिलीय.
निपाह व्हायरस वर उपचार कोणते ?
या आजारावर अद्याप कोणतेही औषधे व लस सापडलेली नाही, त्यामुळे या विषाणू संसर्गावर थेट उपचार करता येत नाही. एखाद्या व्यक्तीला जर संसर्ग झाल्याचे लक्षात येताच त्यांना प्राथमिक उपचार केले जातात. अनेकदा रूग्णाला आतिदक्षता विभागात ठेऊन उपचार केले जातात. संसर्ग झाल्यावर इन्क्युबेशन कालावधी ५ ते १४ दिवसांचा असतो. ठोस उपचार नसल्याने अनेकदा निपाहची लागण झालेल्यांचा मृत्यू होतो.
महत्वाची गोष्ट :
हा निपाह व्हायरस एका वटवाघळाकडून कोणत्याही दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. जर एका वटवाघळाला या विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये ‘अॅन्टीबॉडीज’ तयार होतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होत नाही, मोजक्याच वटवाघळांमध्ये विषाणूचा संसर्ग होतो.