BJP MP Anil Firojiya Weight Loss Diet: उज्जैनचे भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी नितीन गडकरींचे चॅलेंज पूर्ण करून काहीच महिन्यात तब्बल ३२ किलो वजन घटवले आहे. आता नितीन गडकरींकडून दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांना तब्बल ३२,००० कोटींचे बक्षीसही मिळणार असल्याचे समजत आहे. कनोजिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरींनी फिरोजिया यांना वजन कमी करण्यासाठी आव्हान दिले होते. एक किलो वजनावर एक हजार कोटी रुपयांच्या विकास योजनांना मंजुरी देणार असल्याचे गडकरींनी सांगितले होते. यानुसार आता ककनोजिया यांनी ३२ किलो वजन कमी केले आहे. या वजन कमी करण्याच्या मोहिमेत फिरोजिया यांनी नेमकं कोणत्या प्रकारचं डाएट फॉलो केलं तसेच त्यांची जीवनशैली कशी होती हे आता आपण पाहणार आहोत.
आयुर्वेदाच्या मदतीने कमी केले ३२ किलो वजन
आपणही वजन कमी करण्याच्या मिशनवर असाल तर आहार व व्यायामाच्या बाबत फिरोजिया यांनी पाळलेल्या नियमांना विचारात घेऊ शकता. फिरोजिया सांगतात की, “मी रोज सकाळी ५. ३० वाजता उठून मॉर्निंग वॉकसाठी जात होतो. याशिवाय सकाळी जॉगिंग, व्यायाम व काही वेळ योगा असे माझे रुटीन बनवले होते. याशिवाय मी पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धती व नियम पाळूनच वजन कमी केले आहे.”
वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन कसा होता?
फिरोजिया यांनी वजन कमी करण्यात आयुर्वेदाची फार मदत झाल्याचे सांगितले. सकाळी साधा नाष्टा, दुपारी व रात्रीच्या जेवणात सॅलेड व एक वाटी हिरव्या भाज्या ( पालेभाजी) खात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गव्हाच्या पोळ्या बाळगुन त्यांनी मिश्र धान्याच्या पोळ्या आहारात समाविष्ट केल्याचेही त्यांनी नमूद केले. आहारात गाजर सूप व ड्राय फ्रुटचा समावेश केल्याचे फिरोजिया यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, फिरोजिया यांनी जेव्हा वजन केल्याची माहिती नितीन गडकरी यांना दिली तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. आपण दिलेल्या आश्वासनानुसार आता नितीन गडकरी यांनी उज्जैन साठी तूर्तास ३२०० कोटी रुपयांच्या विकास योजनांना मंजुरी दिली आहे. भविष्यात आणखी थोडे वजन कमी करून उज्जैनसाठी आणखी विकास निधी प्राप्त करण्याचा मानस फिरोजिया यांनी व्यक्त केला आहे.