सेलफोन म्हणजेच मोबाईल फोनमधून बाहेर पडणारी प्रारणे व मोबाईल टॉवर नेटवर्क यामुळे आरोग्यावर काहीच वाईट परिणाम होत नाही, असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असून जर काही परिणाम होत असेल तर तो फार किरकोळ स्वरूपाचा असतो असे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आतापर्यंतच्या अभ्यासात मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींनी कर्करोग व इतर रोगांचा धोका असतो असे स्पष्ट झालेले नाही. वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, मेंदूच्या क्रि येवर परिणाम, झोपेवर परिणाम होऊ शकतात असे अभ्यासात दिसून आले आहे, पण ते परिणाम आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ असतात. मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ लहरी अधिक परिणामकारक असून जर काही परिणाम होत असेल तर तो हँडसेटमुळे असू शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. मोबाईल फोनचा वापर वाढत आहे व तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे, रेडिओ लहरींचे क्षेत्र नेमके काय परिणाम करते याचा अभ्यास जागतिक आरोग्य संघटनेने केला असून त्याच्या आधारे २० सप्टेंबरला ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Story img Loader