नॉइझ (Noise) कंपनीकडून वर्षभराच्या अखेरीस प्रीमियम श्रेणीतील “स्मार्ट वॉच” लॉंच करणार असून याची किंमत १५ हजार रुपयांच्या आत असणार आहे. रिसर्च फर्म आयडीसी कडून भारताचा अव्वल घड्याळ ब्रँड म्हणून स्थान मिळवणारी नॉइझ कंपनी वर्षभरात पहिलं प्रीमियम स्मार्ट वॉच बाजारात आणणार असल्याची माहिती सहसंस्थापक अमित खत्री यांच्या कडून देण्यात आली.
या कंपनीने सात हजार रुपयांखालील ब्रँडेड वस्तूंपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतचं स्मार्ट वॉच तुम्ही घेऊ शकता असं सांगितलं आहे. एकीकडे माणसं त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्मार्ट उपकरणे विकत घेत आहेत. यात स्मार्ट उपकरणांचा वेगाने वापर होत आहे. म्हणून नॉइझसारख्या कंपनीनं लोकांना परवडणारी स्मार्ट उपकरणे बनवण्याच्या बाबतीत भारतातील टॉप पाच कंपनीमध्ये स्थान प्राप्त केलंय.

यावेळी कंपनीचे संस्थापक खत्री यांनी सांगितले कि , ते नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांवर काम करत आहेत. ज्यामुळे प्रीमियम श्रेणीतील उत्पादने ग्राहकांना मिळतील व सर्वांसाठीच ते फायदेशीर ठरेल. या वर्षाच्या शेवटी सर्व ग्राहकांना स्मार्ट वॉचचा नवा पोर्टफोलिओ बघायला मिळणार आहे. हे स्मार्ट वॉच अत्यंत आकर्षक डिझाइनचं असेल तसेच यातून तुम्ही फोन कॉल करता येण्यासारख्या सुविधादेखील देण्यात येणार आहेत.

नॉइझ कंपनीचा भर थोड्या काळात बरीच उत्पादने आणण्यापेक्षा आहेत ती उत्पादने सुधारण्यावर असणार आहे. तसेच कंपनीकडून उत्कृष्ठ दर्जाचे उत्पादन बनवून ते थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. कलरफिट प्रो 2 या स्मार्ट वॉचची दहा लाखांहून अधिक विक्री झाली असून कलरफिट प्रो 4 लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्यामुळे कंपनीने नवीन उत्पादनांवर भर देणार नसल्याचे संपष्ट केले आहे. कंपनीला असा विश्वास आहे की ऑडिओ प्रकारातील या ब्रँडचे स्थान या वर्षातील चौथ्या तिमाहीपर्यंत अधिक मजबूत होईल. ऑडिओ स्पेसमध्येही पहिल्या पाचमध्ये कंपनी असल्याने कंपनीची स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.