नोकियाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन २४ नोव्हेंबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकिया २ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रिलायन्स जिओकडून खास ऑफर देण्यात आली आहे. ग्राहकांना ४५ जीबी ‘४ जी’ डेटा रिलायन्स जिओकडून देण्यात आला आहे. नऊ महिन्यांच्या वर ३०९ आणि त्यावरचे रिचार्ज केल्यास ग्राहकांना ५ जीबी डेटा दिवसाला मिळणार आहे. त्याचबरोबर फोनला वर्षभरासाठीचे विमा संरक्षण मोफत पुरविण्यात येणार आहे.
नोकिया २ फोनची वैशिष्ट्ये
– ५ इंचाचा एचडी डिस्प्ले
– १.३ GHz क्वॉड कोअर प्रोसेसर
– १ जीबी रॅम, ८ GB स्टोरेज
– ८ मेगा पिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा
– ४१००mAh बॅटरी
४१००mAh क्षमतेची बॅटरी हे या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे युजर्सना दोन दिवस मोबाईलची बॅटरी चार्ज करावी लागणार नाही, असा दावा नोकियानं केला आहे. स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकिया कंपनी मागे पडली, पण एप्रिल महिन्यात टप्प्या टप्प्यानं नोकियानं ‘नोकिया ३’, ‘नोकिया ५’, ‘नोकिया ६’ आणि ‘३३१०’ भारतीय बाजारपेठेत लाँच करून जम बसवण्याचा प्रयत्न केला. तीन वेगवेगळ्या रंगात हा फोन भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनची किंमत ६,९९९ रुपये असणार आहे.