नोकिया ३३१० ची भारतामध्ये सर्वजण आतुरतेनी वाट पाहत आहेत. हा फोन नेमका कोणत्या इ-कॉमर्स वेबसाइटवर विकला जाणार याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. परंतु, ओन्ली मोबाइल (www.onlymobiles.com) या कंपनीने आपल्या वेबसाइटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल असा दावा केला आहे.

या फोनची अद्याप विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली नाही. केवळ लवकरच येत आहे असे या वेबसाइटवर दिसत आहे. या वेबसाइटनुसार हा फोन १२ महिन्यांच्या वारंटीसह येणार आहे तसेच एक महिन्याच्या प्राइज गॅरंटीसह हा फोन मिळू शकेल.
बार्सिलोनामध्ये पार पडलेल्या ‘मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये नोकियाने ‘३३१०’ पुन्हा आणण्याचा निर्णय जाहीर केला होता.

साडेतीन हजार रुपयांत हा मोबाइल नव्या रूपात, नव्या ढंगात पण जुनी ओळख घेऊन बाजारात दाखल होणार असल्याचे नोकियाने सांगितले होते. सध्या टच स्क्रिन आणि स्मार्टफोनच्या जगात नोकिया कधीच मागे पडली, पण याही काळात आपण कीपॅडवरच चालणार आहे आणि त्याची मजबुती आधीसारखीच असणार असल्याचे नोकियाने सांगून ३३१०च्या रिलाँचची घोषणा केली. हा फोन एप्रिलमध्ये लाँच होणार असल्याची चर्चा होती. इंडिया टुडेच्या मते हा फोन १७ मे रोजी भारतात लाँच केला जाणार आहे.
नोकिया ३३१०ची वैशिष्ट्ये
* २.४ इंची आकाराचा रंगीत डिस्प्ले हा या फोनमध्ये केलेला सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट पाहता येईल, अशी रचना यात केली आहे.
* ‘३३१०’मधला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे कॅमेरा. या फोनमध्ये दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. सोबत एलईडी फ्लॅश देखील आहे, पण फ्रंट कॅमेरा मात्र यात नसणार.
* फक्त आणि फक्त नोकियामध्ये उपलब्ध असलेला स्नेक गेमही यात आहे. चार बटणांवर तो खेळता येणार आहे. ‘स्नेक’ गेम नव्या ‘३३१०’ मध्ये अधिक आकर्षक रूपात असणार आहे.
* दीर्घ बॅटरी लाईफ हा नोकियाचा यूएसपी आहे. या फोनची बॅटरी लाईफ २२ तासांपर्यंत आहे, तर ‘स्टॅण्डबाय’ स्वरूपात हा फोन महिनाभर चार्जिंगशिवाय ग्राहकांना वापरता येणार आहे.

Story img Loader