नोकियाचे मोबाइल फोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबल या कंपनीने आपला Nokia 5.1 Plus हा स्मार्टफोन ऑफलाइन पद्धतीत ग्राहकांना उपलब्ध केला आहे. उद्या म्हणजेच 15 जानेवारीपासून हा स्मार्टफोन ऑफलाइन प्रकारात अर्थात देशभरातील मोबाइल दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच झाल्यापासून हा स्मार्टफोन केवळ ऑनलाइन खरेदी करता येत होता. फ्लिपकार्ट आणि Nokia.com/phones या संकेतस्थळावरुनही हा फोन खरेदी करता येईल. ग्लॉस ब्लॅक, ग्लॉस व्हाइट आणि ग्लॉस मिडनाइट ब्ल्यू अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

भारतात हा फोन लाँच करण्यात आला त्यावेळी या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी होती. पण आता या फोनच्या किंमतीत 400 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता 10 हजार 599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

या फोनमध्ये ड्युअल सिमकार्ड, अँड्रॉयड ओरिओ ८.१ आणि ५.८६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, २.५ डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन, पी ६० प्रोसेसर, ३ जीबी रॅमसह ३२ जीबीची स्टोरेज, ड्युअल रिअर कॅमेरा असून पहिला १३ मेगापिक्सलचा तर ५ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. ३०६० एमएएच क्षमतेची बॅटरी असून यूएसबी टाइपसी, ३.५ एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही या मोबाइलमध्ये आहे.