भारतात HMDचा नवीन फोन नोकिया सी २० प्लस दाखल झाला आहे. हा फोन एप्रिल महिन्यामध्ये लॉंच झालेल्या नोकिया सी २० चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. कंपनीचा नवीन सी २० प्लस हा लेटेस्ट एंट्री लेव्हल फोन आहे. विशेष म्हणेज HMD या फोनसोबत एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटीही देत ​​आहे. म्हणजेच तुमच्या सध्याच्या फोनमध्ये काही समस्या असल्यास कंपनी तुम्हाला नवीन फोन देईल. कंपनीने २ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी नोकिया सी २० प्लसची किंमत ८,९९९ रुपये इतकी ठेवली आहे. तर याच फोनच्या ३ जीबी + ३२जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

नोकिया सी २० प्लसची नोंदणी जर तुम्ही स्वतः जिओ विशेष कार्यक्रमासह केली तर तुम्हाला १०% सूट मिळू शकते. ग्राहकांना रिलायन्स जिओ स्टोअर किंवा नोकिया स्टोअरमधून या ऑफरचा लाभ मिळू शकतो. ऑफरनंतर या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत ८,०९९ रुपये आणि ३ जीबी मॉडेलची किंमत ८,९९९ रुपये असेल. या व्यतिरिक्त, जिओ एक्सकॅल्युसिव्ह प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला या फोनवर ४,००० रुपयांचा लाभ मिळू शकेल. दरम्यान, नोकिया सी २० चे फीचर्स नेमके काय काय आहेत? जाणून घेऊयात.

काय आहेत फीचर्स?

नोकिया सी २० प्लसमध्ये ६.५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये १.६ GHz ऑक्टा-कोर SC9863a प्रोसेसर आहे. यात ग्राहकांना २ जीबी आणि ३ जीबी रॅमचा पर्याय मिळतो. तर फोनची स्टोरेज क्षमता ३२ जीबीपर्यंत आहे. दरम्यान, युझर्स मायक्रो एसडी कार्डद्वारे ही स्टोरेज क्षमता २५६ जीबी पर्यंत वाढवू शकतात. हा नोकिया फोन अँड्रॉइड ११ गो एडिशनसह येतो.

खास आहे फोनचा कॅमेरा

नोकिया सी २० प्लसमध्ये ८ मेगापिक्सलचा ऑटोफोकस तर २ मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या कॅमेऱ्यात युझर्सना पोर्ट्रेट मोड, एचडीआर आणि ब्यूटीफिकेशन सारखी फीचर्स आहेत. त्याचसोबत या फोनमध्ये ४९५०mAh ची उत्कृष्ट बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय ८०२.११ बी / जी / एन, ब्लूटूथ ४.२, जीपीएस / ए-जीपीएस, अॅम्बियंट लाईट सेन्सर यांसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत.