HMD Global कंपनीने त्यांचा नवीन ‘Nokia XR20’ हा (rugged) स्मार्टफोन बाजारात लॉंच केला आहे. ‘Nokia XR20’ हा स्मार्टफोनच्या डिझाइन बरोबरच फीचर्सच्या बाबतीत देखील अतिशय मजबूत आहे. हा स्मार्टफोन अशा प्रकारे डिझाईन केला आहे की तुमच्याकडे बराच काळ फोन टिकू शकतो. कारण या फोनचा मुख्य भाग म्हणजे यात स्क्रॅच रेझिस्टेंट, ड्रॉप रेझिस्टेंट, टेंपरेस्ट रेझिस्टंट, वॉटर रेझिस्टंट आणि किड्स व पेट रेसिस्टेंट असे उत्तम फीचर्स आहेत. या स्मार्टफोन मध्ये युजर्सला ४ वर्षाची सिक्योरिटी अपडेट मिळणार असल्याचा दावा यावेळी कंपनीने केला आहे. चला तर मग या नवीन स्मार्टफोनची किंमत तसेच फीचर्स बद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Nokia XR20: किंमत आणि सेल डिटेल

Nokia XR20 हा स्मार्टफोन अमेरिकेच्या बाजारात लॉंच करण्यात आलाय. या स्मार्टफोनची भारतीय बाजारातील किंमत जवळजवळ ४०,९०० एवढी असणार आहे. यात ६ GB रॅमसह १२८ GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलाय. हा स्मार्टफोन अल्ट्रा ब्लू आणि ग्रॅनाइट कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन २४ ऑगस्टपासून त्याची विक्री सुरू होणार आहे.

Nokia XR20: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Nokia XR20 या स्मार्टफोनची स्क्रीन ही Gorilla Glass Victus पुर्णपणे कोट केलेली आहे. त्याचबरोबर 6.67 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. जो स्क्रीन resolution १०८० × २४०० पिक्सल रिझोल्यूशन आणि पंच होल कटआउट डिझाइन करण्यात आलाय. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon ४८० प्रोसेसरवर काम करणार असून स्टॉक अँड्रॉइड ११ ओएसवर आधारित या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना चार वर्षांची सिक्योरिटी अपडेट मिळत रहाणार आहे.
कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचे प्रायमरी सेन्सर ४८ एमपी आहे, तर १३ एमपी वाइड एंगल लेन्स समाविष्ट करण्यात आलाय. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीच्या सोयीसाठी यात ८ MPचा फ्रंट कॅमेरा आहे. यात तुम्हाला ४,६३० mAh पॉवरची बॅटरी मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, ३.५ mm हेडफोन जॅक असून यात ब्लूटूथ ५.१ असे फीचर्स देण्यात आले आहे.