Hemoglobin levels: रक्तातील हिमोग्लोबीनची मात्रा योग्य असेल तर संपूर्ण शरीरात सुरळीतपणे काम होईल. कमी हिमोग्लोबिनमुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हिमोग्लोबिनची कमतरता अगदीच कमी असेल तर त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
सामान्य हिमोग्लोबिन किती असावे? What should be the normal hemoglobin
नॉर्मल रेंज हिमोग्लोबिनची पातळी पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी असते. सामान्यतः, पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य पातळी (What are hemoglobin levels?) १३.५-१७.५ ग्रॅम प्रति डेसीलिटर असते. स्त्रियांमध्ये, जर ही पातळी १२.०-१५.५ग्रॅम प्रति डेसीलिटर असेल तर हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य मानले जाते. (Normal hemoglobin levels Chart)
हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्याचे संकेत (Signs of anemia)
- तीव्र चक्कर येणे
- त्वचा पिवळसर होणे
- त्वचा पांढरी होणे
- धाप लागणे
- जीभ, नखांमध्ये शुभ्रपणा
- अशक्तपणा, थकवा जाणवणे
- चेहरा किंवा पाय सुजणे
- डोकेदुखी
- असामान्य हृदयाचा ठोके जाणवणे
वयानुसार हिमोग्लोबिनची सामान्य पातळी किती असावी (Normal hemoglobin levels by age)
- नवजात: १४-२४ g/dL
- ०-२ आठवडे: १२-२० g/dL
- २-६ महिने: १०-१७ g/dL
- ६ महिने- १वर्ष: ९.५-१४ g/dL
- १-६ वर्षे: ९.५-१४ g/dL
- ६-१८ वर्षे: १०-१५.५ g/dL
- पुरुष: १४-१८ g/dL
- महिला: १२-१६ g/dL
- गरोदर स्त्रिया: >११g/dL
मुले, पुरुष आणि महिलांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य रेंज (Normal values for hematologic parameters in children, Male and Female)
वय | हिमोग्लोबिन (g/dL) | हिमोग्लोबिन (g/dL) | हेमॅटोक्रिट (%) | हेमॅटोक्रिट (%) | MCV (fL) | MCV (fL) | RDW (%) | RDW (%) |
वय | कमी मर्यादा | वरची मर्यादा | कमी मर्यादा | वरची मर्यादा | कमी मर्यादा | वरची मर्यादा | कमी मर्यादा | वरची मर्यादा |
६ महिने ते < २ वर्षे* | ११.०¶ | १३.५ | ३१ | ४२ | ७३ | ८५ | १२.३ | १५.६ |
२ ते ६ वर्षे | ११.०¶ | १३.७ | ३४ | ४४ | ७५ | ८६ | १२ | १४.६ |
६ ते १२ वर्षे | ११.२ | १४.५ | ३५ | ४४ | ७८ | ९० | ११.९ | १३.८ |
१२ ते १८ वर्ष (महिला) | ११.४ | १४.७ | ३६ | ४६ | ८० | ९६ | ११.९ | १४.६ |
१२ ते १८ वर्ष (पुरुष) | १२.४ | १६.४ | ४० | ५१ | ८० | ९६ | ११.९ | १३.७ |
( हे ही वाचा: उंचीनुसार महिलांचे वजन नेमके किती असावे? पाहा शासनाने जाहीर केलेला ‘हा’ सोपा तक्ता)
MCV: सरासरी कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम
RDW: रेड सेल डिस्ट्रब्यूशन विड्थ
- जन्मानंतर पहिल्या ६ महिन्यांत हिमोग्लोबिन, हेमॅटोक्रिट आणि एमसीव्हीची सामान्य पातळी बदलते.
- ¶ या वयातील हिमोग्लोबिनसाठी सामान्यची कमी मर्यादा ११ g/dL पेक्षा किंचित कमी आहे. तसंच, लहान बाळांमध्ये आणि लहान मुलांमध्ये लोहाच्या कमतरतेच्या एनीमियाच्या स्क्रीनिंगच्या उद्देशाने ऐब्नॉर्मल स्क्रीनला परिभाषित करण्यासाठी अनेक तज्ञ हिमोग्लोबिन <११ g/dL च्या कटऑफचा वापर करतात.