दररोज १० हजार पावले चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असा समज गेली कित्येक वर्षे आपल्या मनात आहे. आपल्या फिटनेस ट्रॅकरवर हा आकडा गाठण्यासाठी लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. पण १० हजार पावले चालल्याने खरंच लठ्ठपणा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार दीर्घकाळासाठी टाळता येऊ शकतात का? एका नवीन संशोधांमधून या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे. यामध्ये लठ्ठपणा टाळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आपल्याला दररोज किती पावले चालणे आवश्यक आहे हे सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहीम येथील एसएल रहेजा हॉस्पिटलमधील वरिष्ठ मधुमेहतज्ज्ञ, डॉ अनिल भोरस्कर म्हणतात की, हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग होण्यामागे लठ्ठपणा हे मुख्य कारण आहे.” आपण जे खातो त्याचे ऊर्जेत रूपांतर होते आणि शरीर या ऊर्जेचा वापर करतं. तरुणांना दररोज १६०० कॅलरीजची गरज असते, तर लहान मुलांच्या वाढीसाठी २००० कॅलरीजची आवश्यकता असते. अतिरिक्त कॅलरीजचे फॅटमध्ये रूपांतर होते, असे डॉक्टरांनी सांगितले.

Health News : रात्री उशिरा जेवल्यामुळे खरंच वजन वाढतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

धरमशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, डॉ गौरव जैन यांनीही याबाबत सहमती दर्शवली. ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीने किती कॅलरी बर्न केल्या आहेत हे त्याचे वय, वजन, तीव्रता आणि अंतर यासह विविध घटकांवर अवलंबून असते. आपण कोणतीही हालचात करतो तेव्हा आपण कॅलरी बर्न करतो. वजन कमी करण्यासाठी, आपण जितक्या कॅलरीजचे सेवन करतो त्यापेक्षा अधिक कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत. यामुळे हृदयविकार, मधुमेह, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, ऑस्टिओपोरोसिस आणि कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच यामुळे आपला तणाव कमी होऊन मूड सुधारू शकतो.

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की दररोज ८६०० पावले चालल्यास वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यात असेही सांगण्यात आले आहे की ज्या व्यक्तींचे वजन आधीच जास्त आहे ते लठ्ठ होण्याची शक्यता कमी करण्यासाठी दिवसाला ११ हजार पावले चालू शकतात. मात्र, डॉ जैन यांनी वजन कमी करण्यासाठी दररोज १० हजार पावले चालण्याचे लक्ष्य ठेवण्याची शिफारस केली आहे.

शतपावलीचा कंटाळा करणाऱ्यांनी एकदा ‘हे’ फायदे वाचाच; अनेक गंभीर आजारांवरही करता येईल मात

डॉ. जैन म्हणतात, तुम्ही दररोज किती पावले चालाल याची एक बेसलाईन तयार करा आणि प्रत्येक आठवड्यात त्यामध्ये १००० पावलाने वाढ करा. डायबिटीज केअरमध्ये फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की चालल्याने टाईप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यात मदत होते, असेही डॉ जैन यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not 10000 the count of steps needed to lose weight different you will be surprised to see the number told by the experts pvp
Show comments