COVID Symptoms 2022: ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांच्या आगमनाने, कोविड १९ चे प्रकरण भारतात दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून त्याची लक्षणेही बदलू लागली आहेत. तसंच यावेळी देखील लक्षणे बदल्याचं दिसून येतंय. ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराने संक्रमित असलेल्या रुग्णांमध्ये अतिसार, लघवी कमी होणे आणि छातीत दुखणे ही नवीन लक्षणे डॉक्टरांना दिसून आली आहेत. यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे छातीत दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
आकाश हेल्थकेअरचे वरिष्ठ सल्लागार, श्वसन आणि झोपेचे औषध अक्षय बुधराजा यांनी IANS यांना सांगितले की, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीव्र कोरोनरी सिंड्रोम, मायोकार्डियल इन्फेक्शन (हृदयविकाराचा झटका) ची संख्या वाढत आहे. असे अनेक रुग्ण आहेत जे अतिसार, छातीत दुखणे आणि लघवी कमी होण्याच्या तक्रारी घेऊन येतात आणि नंतर ते कोविड पॉझिटिव्ह आढळतात. कोविड रुग्णांमध्ये ही लक्षणे यापूर्वी कधीही दिसली नाही आहेत.
( हे ही वाचा: Immunity Booster: रोज सकाळी ‘ही’ कामे करा, अनेक आजार जवळ देखील येणार नाहीत)
कोविडची इतर लक्षणे
वर नमूद केलेल्या लक्षणांव्यतिरिक्त, डॉक्टरांनी सांगितले की नवीन कोविड रूग्ण अशा लक्षणांची तक्रार करत आहेत जसे की:
- चक्कर येणे
- भयंकर अशक्तपणा
- सुगंध आणि चव कमी होणे
- ताप किंवा थरथर
- खोकला
- श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास
- थकवा
- स्नायू किंवा शरीरात वेदना
- डोकेदुखी
- घसा खवखवणे
- रक्तसंचय किंवा वाहणारे नाक
- उलट्या किंवा मळमळ
( हे ही वाचा: Fruits To Eat During Cancer: कॅन्सरच्या रुग्णांनी आहारात ‘या’ फळांचा समावेश जरूर करावा)
Omicron BA 2.75 चा नवीन प्रकार काय आहे
Omicron चा सब-व्हेरियंट BA 2.75 हा वेगाने विस्तारणारा प्रकार आहे, जे काही काळापूर्वी दिल्लीत आढळला होता. डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की BA.2.75 मध्ये अशा प्रकारे उत्परिवर्तन झाले आहे की ते आता सहज प्रतिकारशक्ती टाळण्यास सक्षम आहे. नवीन सबवेरियंट अशा लोकांना देखील संक्रमित करत आहे ज्यांनी लस घेतली आहे.
अधिक गंभीर संसर्ग नाही
चांगली बातमी अशी आहे की जरी Omicron BA.2.75 मुळे केसेस झपाट्याने वाढत आहेत, तरी हा प्रकार आतापर्यंत धोकादायक सिद्ध झालेला नाही. स्वामिनाथन म्हणाले की हे स्पष्ट आहे की नवीन प्रकार इतर प्रकारांपेक्षा जास्त वेगाने संक्रमित आहे, परंतु सध्या तो किती धोकादायक आहे हे सांगणे कठीण आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या बहुतांश रुग्ण आठवडाभरात बरे होत आहेत.