जगभरात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये चुकीचे खानपान आणि जीवनशैली याप्रमाणेच इतरही अनेक कारणे आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का की पुरेशी झोप न घेणे हे देखील हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास ते हृदयविकाराचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती तास झोप घेतली पाहिजे? आणि झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या कशा होऊ शकतात, हे आज आपण जाणून घेऊया.
एखाद्या व्यक्तीसाठी तिचा आहार जितका महत्त्वाचा असतो तितकीच झोपही महत्त्वाची आहे. पण बरेच लोक हे विसरतात आणि ते रात्री पुरेशी झोप घेत नाही, ज्यामुळे अनेक आजार त्यांना घेरतात. जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोपतात, त्यात लठ्ठपणा, उच्च रक्तदाबाची समस्या, मधुमेह यांसारख्या आजारांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत दररोज सात तासांपेक्षा जास्त आणि १० तासांपेक्षा कमी झोप घेणे आवश्यक आहे.
Photos : पुरुषांसाठी अतिशय फायदेशीर आहे काळी मिरी; ‘या’ समस्या होतील दूर
जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. कारण झोप हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. जे लोक आठ तासांची झोप घेतात त्यांचे हृदय कमी झोपलेल्या लोकांपेक्षा निरोगी असते. त्यामुळे जर तुम्हालाही कमी झोपण्याची सवय असेल तर आजच ही सवय बदलावी.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)