Health Benefits Of Peanuts: बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु प्रत्येकजण हे बदाम खरेदी करू शकत नाही. तसेच काही लोकांना ते खायला आवडत नाही. मग तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी दुसरा कोणता पर्याय आहे? तर आज आम्ही तुम्हाला सोपा आणि सगळ्यात स्वस्त असा पर्याय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास नक्की मदत होईल. हा पर्याय म्हणजे शेंगदाणे… होय, शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शेंगदाणे स्मरणशक्ती देखील सुधारतात. तसेच वयाशी संबंधित मानसिक आजारांवर मात करण्यास मदत होते. शेंगदाण्यामध्ये आढळणारे मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड सारखे विशेष घटक खराब कोलेस्ट्रॉलला प्रतिबंध करतात. शेंगदाण्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. ते केवळ भरपूर ऊर्जाच नाही तर प्रथिनांनी देखील समृद्ध आहेत. चला तर मग पाहूया शेंगदाणे खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि ते किती प्रमाणात खावे.
( हे ही वाचा: सकाळी उठून फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; Blood Sugar Level राहील नियंत्रणात)
शेंगदाणे खाण्याचे इतर फायदे
निरोगी हृदय
वेबएमडीनुसार, शेंगदाण्यामध्ये कार्डिओ-संरक्षणात्मक गुणधर्म असतात. अशा परिस्थितीत जे लोक नियमितपणे शेंगदाणे खातात. त्यांचा हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल सुधारते आणि रक्ताच्या लहान गुठळ्या होण्याच्या समस्येस प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढत नाही.
स्वस्थ मेंदू
मेडिकल न्यूज टुडेनुसार, ओमेगा -३ फॅटी ऍसिड शेंगदाण्यामध्ये आढळतात. हे एक फॅटी ऍसिड आहे जे मेंदूचे कार्य वाढवते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. अशा स्थितीत मुलांना दररोज सकाळी नाश्त्यामध्ये नियमितपणे भिजवलेले शेंगदाणे खायला द्यावे.
( हे ही वाचा: Uric Acid: रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका; सांधेदुखीची समस्या वेगाने वाढू शकते)
त्वचेसाठी फायदेशीर
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला वृद्धत्वापासून वाचवतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.
बॉडी बिल्डिंगसाठी फायदेशीर
मेडिकल न्यूज टुडेनुसार, बॉडी बिल्डर्ससाठी दररोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे मांसपेशी तयार होण्यास मदत होते.
( हे ही वाचा: Low Blood Pressure: रक्तदाब कमी झाल्यावर लगेच मीठ किंवा साखरेचे पाणी प्यावे का? जाणून घ्या बाबा रामदेव काय सांगतात)
पचन सुधारते
यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत करते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित काम करते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
शेंगदाणे किती प्रमाणात खावे?
दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने ४८२२ चिनी प्रौढांवर एक अभ्यास केला. त्यानंतरच्या विद्यापीठातील प्रमुख संशोधक मिंग ली म्हणाले, “दररोज १० ग्रॅम किंवा दोन चमचे शेंगदाणे खाल्ल्याने वृद्ध लोकांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत संज्ञानात्मक कार्य सुधारू शकते. ज्या लोकांनी शेंगदाणे खाल्ले त्यांची स्मरणशक्ती शेंगदाणे न खाणार्यांपेक्षा चांगली होती. त्यामुळे शेंगदाणे तुमच्या स्मरणशक्तीसाठी उपयुक्त आहे. परंतु त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.
( हे ही वाचा: १० वर्षांपूर्वीच दिसू लागतात हृदयविकाराची ‘ही’ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे)
तुम्ही खूप शेंगदाणे खाल्ले तर काय होते?
आरोग्य वेबसाइट वेबएमडीनुसार, जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्याने प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. वजन वाढण्याचा किंवा ऍलर्जीचा धोका वाढू शकतो. कारण शेंगदाण्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते. पण जर शेंगदाणे कमी प्रमाणात खाल्ले तर हे ट्रायप्टोफन तुमचा मूड सकारात्मक ठेवण्यास आणि नैराश्यापासून दूर राहण्यास मदत करू शकते. यामध्ये असलेले तेल तुमच्या केसांची वाढ सुधारण्यासाठी पुरेसे आहे. शेंगदाणे जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी, आपण ते सॅलडसह खावे.