असंतुलित आहार, अति खाने यामुळे वजन वाढण्याची समस्या होत आहे. बदलती जीवनशैलीचा देखील वाढत्या वजनाशी संबंध आहे. गरजेपेक्षा अधिक वजन वाढल्यास ते आरोग्याला धोकादायकही ठरते. त्यामुळे, वजन कमी करण्याकडे आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी लोकांकडून नानावीध गोष्टींचा अवलंब केला जातो. काही पदार्थांचा त्याग लोकांकडून केला जातो. मात्र, शरीराला आवश्यक प्रमाणात सर्वच पदार्थ लागतात. वजन कमी करण्यासाठी लोक तेलकट आणि तूप असलेले पदार्थ टाळतात. मात्र, हे पदार्थ सोडल्यास खरच वजन कमी होते का? यावर तज्ज्ञ काय म्हणाले जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

(आरोग्यासाठी गुणकारी आहे अक्रोड, शरीरासाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘या’ पदार्थाला ठेवतो नियंत्रणात)

अन्न बनवण्यासाठी तेल किती वापरावे?

पोषणतज्ञ भुवन रस्तोगी यांनी अलीकडेच आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चरबी मुक्त जेवण आरोग्यावर काय परिणाम करते यावर माहिती दिली आहे. फॅट आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे की नाही. ते शरीराच्या विकासात कोणती भूमिका बजावते, यावर रस्तोगी यांनी माहिती शेअर केली आहे. त्यांनी फॅटचे काही फायदे गिनवले आहेत.

अन्न बनवण्यासाठी तेल किती वापरावे असे लोक मला विचारतात. आणि मी नेहमी त्यांना समजावून सांगतो की हा शेवटचा पर्याय असावा. पौष्टिक गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे. फॅट गरजेचे आहे, असे रस्तोगी म्हणतात. प्रथिने, योग्य प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन आणि पाणी पिण्यावर लक्ष द्या असे त्यांनी सूचवले.

(‘हे’ संशोधन वाचून न पिणारेही आनंदाने घेतील चहाचा आस्वाद)

फॅट सोल्यूबल जीवनसत्वे जसे ए, डी, ई आणि के यांचे शोषण करण्यात फॅट मदत करते. फॅट आपल्या मेंदूसाठी महत्वाचे असून ते वाढत्या वयानुसार कमी होणारी स्मरणशक्ती नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. फॅटमध्ये कॅलरी जास्त असली तरी ते जेवल्याचे समाधान देते. फॅट नसलेले पदार्थ खाऊन तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटणार नाही आणि अजून भूक लागले. परिणामी, फॅट नसलेले पदार्थ न खालल्याने काही मोठा फरक पडणार नाही, असे रस्तोगी सांगतात. तसेच आहारातील चरबी शरीरातील चरबी सारखी नसते. फॅटविरहित अन्नामुळे देखील शरीरात चरबी जमा होऊ शकते, असा इशारा देखील रस्तोगी यांनी दिला.

मग काय करावे?

प्रथिने, योग्य प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन आणि पाणी पिण्यावर लक्ष द्या. क्रियाशील दिनचर्या घडवावी. तरी देखील तुमचे वजन वाढत असेल तेव्हाच स्वयंपाकात तेल वापरण्याचे प्रमाण कमी करावे. आरोग्याला हानीकारक फॅट टाळणे आवश्यक आहे, मात्र त्याचबरोबर योग्य स्त्रोतांमधून फॅट घेतल्यास ते तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी ठरू शकते. जेवणातून प्रथिने आणि फायबर मिळाल्यानंतर तुम्ही कार्ब आणि फॅटमधून इतर उरलेली कॅलरी मिळू शकता. ऑईल एवजी काजू आणि बियाण्यांमधून आपण फॅट मिळवू शकतो, असा सल्ला रस्तोगी यांनी दिला.

(Health Tips : गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या)

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)