इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या आवृत्तीचा शानदार प्रारंभ झाला असून सामन्यांची मागणी वाढत आहे, विशेषतः वीकेंडला खेळल्या जाणाऱ्या सामन्यांच्या आरक्षणासाठी आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहाण्यासाठी प्रवास करण्याचीही तयारी असलेल्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयपीएलने अजूनही प्राथमिक अवस्थेत असलेल्या क्रीडा पर्यटनला नवा आयाम दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुवातीच्या निदर्शकांनुसार हॉटेल्स आणि सेवा पुरवठादारांना आयपीएलचा सामना आणि सुट्टीचं समीकरण साधून आपली सुट्टी आणखी मजेदार करणाऱ्यांकडून फायदा होत आहे. कॉक्स अँड किंग्जमध्ये अशा प्रकारे आयपीएल सामना आणि स्थानिक स्थळदर्शन एकत्रित करून सुट्ट्यांचे आरक्षण करणाऱ्यांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाली आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण कंपनीने नोंदले असून त्यांच्याकडून होणाऱ्या हॉटेल आणि स्थळदर्शनाच्या आरक्षणात २० टक्के वाढ दिसून आली आहे.

विशेष म्हणजे, सामन्यांचे आयोजन करणाऱ्या शहरांच्या आसपास २५०- ३०० किलोमीटर अंतरावरील पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. चंदीगढ, जोधपूर, औरंगाबाद, अलीबाग, आग्रा, म्हैसूर, पुद्दुचेरी या ठिकाणांना जास्त मागणी आहे. हॉटेल्सही या हंगामाचा फायदा घेताना दिसत आहेत, कारण हा हंगाम शहरांतील कित्येक हॉटेल्ससाठी एरवी कमी व्यवसाय देणारा असतो आणि त्यांच्याकडील वीकेंड आरक्षणाचे प्रमाण सामन्यांच्या काळात ३० टक्क्यांवरून थेट ८० टक्क्यापर्यंत वाढलेले दिसून आले आहे.

मागणीतील वाढ लक्षात घेत कॉक्स अँड किंग्जने आयपीएल तारखांदरम्यान ग्राहकांच्या गरजांनुसार पर्यटनाचे खास कार्यक्रम आखले आहेत. शॉपिंग मॉल्समध्येही आयपीएलदरम्यान भरपूर गर्दी दिसून येते. लोक त्यांच्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी रेस्टॉंरंट्स आणि मॉल्समध्ये एकत्रितपणे जमतात. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशभरातील मॉल्समध्ये विविध योजना उपलब्ध केल्या जात आहेत. क्रिकेटच्या टी २० वातावरणाचा लाभ घेण्यासाठी नवी मुंबईतील सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलने खरेदी करताना क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी अभिनव योजना सुरू केली आहे.

मॉलमध्ये ५ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान ‘तिकिट टु हॅपीनेस’ हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत ग्राहकाने प्रत्येकवेळेस खरेदी केल्यानंतर त्याला रन मिळते. उदा. त्याने २५००- ५००० रुपयांदरम्यान खरेदी केल्यास त्याला १ रन मिळते. त्याचप्रमाणे १०,००१- २५,००० रुपयांदरम्यान खरेदी केल्यास चार रन्स मिळतात. क्रिकेटमधली इतर सर्व वैशिष्ट्ये उदा. फ्री हिट आणि एक्स्ट्राजही यात लागू होतात. स्कोअरनुसार ग्राहकांना ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि मॅन ऑफ द सीरीज बक्षिस दिले जाईल. त्याशिवाय मॉलद्वारे साप्ताहिक आयपीएल तिकिटे आणि इंग्लंडमधील विश्वचषकाची कपल तिकिटेही बक्षिस म्हणून दिली जात आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noting the increase in demand cox kings is offering special customised itineraries around the ipl dates