मोबाईलवर गजर (अलार्म) लावण्याची आणि सकाळी गजर झाल्यवर तो पुढे ढकलून (स्नूझ) पुन्हा झोपण्याची सवय असणाऱयांसाठी आता एक नवे अ‍ॅप आले आहे. या अ‍ॅपमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमचा मोबाईल जोरजोरात हलवत नाही, तोपर्यंत त्याचा गजर बंदच होत नाही, अशी सोय करण्यात आलीये. अ‍ॅपमध्ये स्नूझचे बटणही देण्यात आलेले नाही. ‘वेक एन शेक’ असे या अ‍ॅपचे नाव आहे.
बऱयाच लोकांना झोपेतून उठण्यासाठी गजर लावून ठेवण्याची सवय असते. मात्र, त्यापैकी अनेकजण हे गजर झाल्यानंतर त्यातील स्नूझचा पर्याय वापरून गजराची वेळ पुढे सरकवत असतात. त्यामुळे ज्यावेळी गजर लावला आहे, त्यावेळी उठण्याऐवजी झोपेतून उठण्यास उशीर होतो. पर्यायाने पुढील सर्व कामेही उशीराने सुरू होतात. यावर उपाय म्हणून हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.
या अ‍ॅपमध्ये स्नूझ बटणाऐवजी गजर बंद करण्यासाठी मोबाईल हॅण्डसेट हलवण्याची (शेक) सुविधा देण्यात आलीये. जोपर्यंत तुम्ही हॅण्डसेट मुठीत धरून जोरजोरात हलवत नाही. तोपर्यंत त्यातील गजर वाजतच राहतो. गजर बंद करण्यासाठी हॅण्डसेट हलवण्याची गरज पडते. ठरावीक कालावधीसाठी हॅण्डसेट हलवल्यानंतरच त्यातील गजर बंद होतो. यामुळे संबंधित व्यक्तीला झोपेतून खडबडून जागे व्हावेच लागते आणि गजरासाठी निश्चित केलेल्या वेळेलाच ती झोपेतून उठते. अ‍ॅपमध्ये गजर बंद करण्यासाठी हॅण्डसेट हलविण्याचे प्रमाण कमी जास्त केले जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा