यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तींना ‘मोबाईल अॅप’च्या माध्यमातून चुंबनं आणि पुष्पगुच्छ पाठवू शकता. एरवी प्रेमसंदेश आणि टेक्स्ट मेसेजेसद्वारे आपले प्रेम व्यक्त करणा-या प्रेमवीरांना ‘किसएमएस’ या मोबाईल अॅपमुळे आपल्या उत्कट भावना प्रियजनांपर्यंत पोहचवणे शक्य झाले आहे. व्होलमॅक्ट बिझनेस सोल्युशन्स (VBS) या माहिती आणि तंत्रजान क्षेत्रातील कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘किसएमएस’ या अॅप्लीकेशनमुळे प्रेमीजनांना मोबाईलद्वारे चुंबनांची देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे. ‘किसएमएस’ अॅप्लीकेशन आयओएस आणि अॅड्रॉईड तंत्रज्ञान असणा-या मोबाईलवर वापरता येणार असून हे अॅप्लीकेशन संपूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती व्हीबीएस चे मुख्य कार्यकारी अधिकारी बादुशा गुलाम खदर यांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in