बिअर शौकीनांसाठी आनंदाची बातमी, आता ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी तुमच्यासाठी बनवली आहे झिंगायला न लावणारी बिअर. या बिअरमुळे भयंकर नशा टाळता येणार असल्याचा दावा हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
बिअर बनविताना किण्वन प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे बऱयाच कालावधीपासून बिअर हे एक सहायकारी पोषण घटक असणारे पेय म्हणून ओळखले जात आहे. मात्र, अल्कहोलमुळे शरीराचे निर्जलिकरण झपाट्याने होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झा्ल्यामुळे माणसाला झिंगवणारी नशा येते. त्यामुळे अल्कोहोलचे प्रमाण जास्त असणारी बियर शरीरासाठी घातक ठरू शकते.
ऑस्ट्रेलियातील ग्रिफीथ आरोग्य संस्थेच्या (जीएचआय) शास्त्रज्ञांनी या बिअरमध्ये विद्युत अपघटित खनिजे समाविष्ट केली आहेत. खेळाडूंसाठी बनवण्यात येणाऱ्या पेयांमध्ये अशा प्रकारची खनिजे मिसळली जातात. बिअरमधील अल्कहोलचे प्रमाण कमी केल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण सामान्य राहण्यायाठी मदत होणार आहे.  
“आम्ही कुशलपणे बिअरमधील विद्युत अपघटीत खनिजे प्रमाणित केली. संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तींवर या बिअरचा प्रयोग करण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या बिअर पिण्यासाठी देण्यात आल्या. संशोधन केलेली सुधारित बिअर प्यायल्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतूलित राहत असून, नशा होत नसल्याचा निष्कर्ष निघाला”, अशी माहिती ग्रिफीथ आरोग्य संस्थेचे संशोधक प्राध्यापक बेन डेसब्रो यांनी दिली. मात्र, अंगमेहनत व व्यायामानंतर कोणत्याही प्रकारची बिअर पिणे घातक ठरू शकते, असा इशारा या संशोधकांनी दिला.
“बिअर पिणे काही चांगली बाब नाही. आमच्या अभ्यासामध्ये असे आढळले की, बरेच लोक काम करून थकवा आल्यावर बिअर पितात. मात्र, अल्कहोलमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. सातत्याच्या बिअर पिण्यामुळे एखाद्याच्या जिवावरदेखील बेतू शकते, त्यामुळेच आम्ही या सुधारित बिअरची निर्मिती केली आहे”, असे डेसब्रो पुढे म्हणाले.            

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा