सध्याच्या करोनास्थितीत तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आता तुमचं करोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे अर्थात तुमचं करोना लसीकरण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. दरम्यान, आतापर्यंत, हे लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी दोन पर्याय होते. पहिलं म्हणजे कोविन पोर्टल आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेतू अ‍ॅप. मात्र, आता भारत सरकारने यासंदर्भात WhatsApp बरोबर भागीदारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या कार्यालयाने रविवारी (८ ऑगस्ट) याबाबत सांगितलं आहे कि, “ज्या नागरिकांना करोना लसीकरण करण्यात आलं आहे त्यांना अगदी काही सेकंदात व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे लसीकरण प्रमाणपत्र मिळू शकतं.”त्यामुळे, नागरिकांना हे करोना लस प्रमाणपत्र मिळवणं आणखी सोपं होणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी मायजीओवी (MyGov) करोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट डाऊनलोड करावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

WhatsApp वर असं डाऊनलोड करा करोना लसीकरण प्रमाणपत्र

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyGov करोना हेल्पडेस्कचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करावा लागेल. हा क्रमांक 9013151515 आहे.
  • एकदा नंबर सेव्ह झाला की व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून कॉन्टॅक्ट लिस्टमधून जाऊन सर्च करा.
  • करोना हेल्पडेस्कचा चॅटबॉक्स ओपन करून त्यात डाऊनलोड सर्टिफिकेट असं टाईप करा.
  • त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी पाठवेल.
  • ओटीपी तपासा आणि एंटर दाबा.
  • यानंतर चॅटबॉट तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचं करोना लसीकरण प्रमाणपत्र पाठवेल. ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.

त्याचसोबत, या प्रक्रियेदरम्यान जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही एरर दिसला तर तुम्ही पूर्वीप्रमाणेच कोवीन पोर्टल आणि आरोग्य सेतू अ‍ॅपशी संपर्क साधू शकता.

मुंबईत १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासमुभा! लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आतापर्यंत १९ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली. रेल्वेसेवेसाठी राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर किंवा शहरातील महापालिकांच्या कार्यालयातून क्यूआर कोड मिळवणं आवश्यक असेल. अ‍ॅपवर लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. त्यानंतरच परवानगी पत्र मिळेल. क्यूआर कोड दाखवल्यावरच रेल्वे तिकीट खिडकीवर मासिक पास अथवा दैनंदिन तिकीट मिळू शकेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now download covid19 vaccination certificate on whatsapp gst