हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डायबिटीज (Diabetes) म्हणजेच मधुमेहासंदर्भातील जनजागृतीमुळे या आजाराबद्दल आता अनेकजण फारच सतर्क असल्याचे दिसतात. दर दहा व्यक्तींमागे चौघांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. गोड गोष्टींमुळे होणारी ही कडू समस्या अशी आहे की एकदा तिच्या तावडीत सापडलं की खाण्यापिण्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागते. एखादी गोष्ट कमी जास्त खाल्ली तर रक्तातील साखरेची पातळी वाढते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकांना त्यांना आवडणारे अन्नपदार्थ खाता येत नाहीत. मात्र, या लेखात आपण असा चविष्ट पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही आणि चविष्ट पदार्थ खाल्ल्याचा आनंदही मिळेल. मधुमेहाचे रुग्ण हे पदार्थ बिनधास्त खाऊ शकतात. चला जाणून घेऊया या चविष्ट पदार्थांबद्दल.
१. काळ्या चन्यापासून बनवलेलं चाट
काळा चना चाट खायला खूप चविष्ट आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चांगला नाश्ता ठरू शकतो. काळ्या हरभऱ्यामध्ये फायबर आणि प्रोटीन असते. काळ्या हरभऱ्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट हळूहळू पचते त्याच्या मदतीने, रक्तातील साखरेची पातळी कमी केली जाऊ शकते.
२. उपमा
मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्त्यामध्ये उपमा हा चांगला पर्याय आहे. उपमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. पचनसंस्थेला फायबरयुक्त पदार्थ पचवणे सोपे जाते. रव्यापासून बनवलेला उपमा खाल्ल्याने दीर्घकाळ ऊर्जा मिळते. उपमामध्ये असलेले फायबर हळूहळू पचते ज्यामुळे ऊर्जा मिळते.
३. स्वादिष्ट शिंगाडा पराठा
बहुतेक लोकांना उपवासात शिंगाडा पिठापासून बनवलेले पदार्थ खायला आवडते. हे पदार्थही खूप चवदार असतात. शिंगाड्याचे पीठ ग्लूटेन मुक्त आहे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. मधुमेही रुग्ण शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पराठे खाऊ शकतात.