कर्करोग्यांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सरळ कर्करोगाच्या पेशींचा नाशकरणारा एक कृत्रिम सपाट आयताकृती कण शास्त्रज्ञांनी विकसीत केल्याचा दावा केला आहे.
या अभ्यासामध्ये संशोधक शास्त्रज्ञांनी रोगप्रतिकारक शक्तीमधील प्रतिद्रव्यजनक पेशी(एपीसी) आणि टी-पेशींमध्ये संबंध घडवून आणला. या पेशींनी कर्करोगाच्या वाढणाऱ्या पेशींवर सकारात्मक परिणाम केला.
टी-पेशींचा प्रतिद्रव्यजनक पेशींसोबत संपर्क होतो. या संपर्कामुळे कर्करोगाच्या पेशींमधून तयार होणाऱ्या प्रथिनांचा मुकाबला करणाऱ्या नव्या पेशीरूपी कणांची निर्मिती होवून कर्करोगाच्या पेशी मारल्याजातात.          
ही प्रक्रिया नैसर्गिक पध्दतीने वाढवण्यासाठी अनेक प्रयोगशाळांमध्ये कृत्रिम प्रतिद्रव्यजनक पेशींची(एपीसी) निर्मिती केली जात आहे.  
या उपचार पध्दतीमध्ये कर्करोग्यांमधील प्रतिकारक शक्ती असलेल्या पेशींमध्ये ‘एपीसी’चे कृत्रिम कण मिसळले जाता. या एकत्र आलेल्या पेशी टी-पेशींच्या संपर्कात आल्यावर टी-पेशी कार्यक्षम होतात. कर्करोगाच्या पेशींवर या पेशी हल्ला चढवून त्यांना मारतात.
त्वचेचा कर्करोग असलेल्या उंदरावर हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामध्ये टी-पेशींचा कृत्रिम पेशींसोबत संपर्क आल्यावर त्यांनी एकत्र येवून कर्करोगाच्या पेशींचा खात्मा केला.
“पेशींवर आधारीत उपचारपध्दतीमध्ये शास्त्रज्ञांना मर्यादीतचयश मिळाले होते. त्या उपचार पध्दतीमध्ये शरीराबाहेर नव्या पेशी निर्माण होण्याची भिती होती,” असे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ मोडिसिनच्या जैव अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जॉर्डन ग्रिन यांनी सांगितले.       
 ग्रिन आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी या उपचार पध्दतीमध्ये सुधारणाकरण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जैवअपघटनीय पध्दतीने ‘एपीसी’ कण तयार केले. हे कृत्रिम कण कर्करोग्याच्या शरिरातील ‘एपीसी’ पेशींमध्ये सहजरित्या मिसळविणे शक्य झाले असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा