भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ या आठवड्यात उघडणार आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करण्यास कोण पात्र आहेत आणि यात गुंतवणूक कशी करायची या गोष्टींवरून सध्या चर्चा सुरु आहे. यासाठी गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे याबाबत याआधीही कळवण्यात आले आहे.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने एका ट्विटमध्ये आपल्या ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्यास सांगितले आहे. एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “तुमचा गुंतवणुकीचा प्रवास आजच सुरू करा!” एसबीआयने सांगितले की योनोवर तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा, यासाठी तुम्हाला कोणताही ओपनिंग चार्ज लागणार नाही तसेच डीपी एमसी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षासाठी विशेष सूट दिली जाईल.
“मी चंद्राला विचारले, तुला…?” पुणे पोलिसांच्या अनोख्या शुभेच्छांनी जिंकले सर्वांचे मन
यापूर्वी एसबीआयने एसबीआय सिक्युरिटीज डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याद्वारे एलआयसी आयपीओ गुंतवणुकीसाठी समान अधिसूचना जारी केली होती. तथापि, गुंतवणूक सुरू करण्यासाठी, ग्राहकांना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे एसबीआयने सांगितले आहे.
एलआयसी आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, प्रथम तुम्हाला योनो अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल आणि नंतर ‘इन्व्हेस्टमेंट्स’ वर जाऊन तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडावे लागेल. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर, गुंतवणूकदार सहजपणे एलआयसीच्या आयपीओसाठी बोली लावू शकतात. याशिवाय, एसबीआयने डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांच्या पहिल्या वर्षासाठी ओपनिंग चार्जेस आणि डीपी एएमसी देखील माफ केले आहेत.
एलआयसी आयपीओ ४ मे २०२२ ला लॉंच करेल आणि ते ९ मे २०२२ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असेल. २ मे २०२२ रोजी अँकर आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उघडण्यात आला आहे. या आयपीओमध्ये २०,५५७ कोटी रुपयांच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे, जिथे केंद्र सरकार आपला ३.५ % हिस्सा विकणार आहे. या अंतर्गत, एकूण २२.१० कोटी इक्विटी शेअर्स ऑफर केले जातील.