तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी यापुढे कोणत्या गोळ्या घेण्याची किंवा इंजेक्शन टोचण्याची गरज पडणार नाही. तुमच्या हातावर लावलेला एक पट्टी शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करेल. जपानमध्ये अशी पट्टी तयार करण्यात आली असून, तेथील रक्तदाबाचा त्रास असणाऱया रुग्णांवर तिचा वापरही सुरू करण्यात आलाय.
जपानमधील एका औषधनिर्मिती करणाऱया कंपनीने ही पट्टी तयार केलीये. रुग्णाने ही पट्टी हातावर चिकटवली की त्यातील औषध रुग्णाच्या त्वचेच्या माध्यमातून शरीरामध्ये उतरते आणि रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करते. रुग्ण ही पट्टी त्याच्या हातावर, छातीवर किंवा पाठीवर चिकटवू शकतो. दिवसातून एकवेळा ही पट्टी बदलावी लागते.
पट्टीच्या माध्यमातून रक्तदाब नियंत्रित करणाऱया औषधाचा रुग्णाच्या शरीराला सातत्याने पुरवठा होत असल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याची किंवा पक्षाघात होण्याची शक्यता मंदावते, असे अभ्यासातून दिसून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘डेली एक्स्प्रेस’मध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुढील काही महिन्यात ही पट्टी इंग्लंडमध्येही रग्णांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक पट्टीमध्ये चार किंवा आठ मिलिग्रॅम औषधाची मात्रा असते. जपानमधील निट्टो डेंको कंपनीने ही पट्टी तयार केलीये.

Story img Loader