कॉफी हे फक्त पेयजल आहे, असे यापुढील काळात कोणी म्हणू शकणार नाही. कारण लवकरच स्प्रेच्या माध्यमातून कॉफीचा आनंद घेण्याची मुभा कॉफीप्रेमींना मिळणार आहे!
शास्त्रज्ञ बेन यू यांनी डेवेन सोनी यांच्यासोबत या नव्या स्प्रे करता येण्यासारख्या कॉफीचा शोध लावलाय. हे दोघेही हार्वर्ड विद्यापीठामधील संशोधक आहेत. त्यांच्यामते कॉफीप्रेमींना ती प्यायल्यामुळे जितका आनंद मिळतो, तितकाच या नव्या स्प्रेमुळेही मिळेल. त्याचबरोबर कॉफीतील कॅफीन या घटकद्रव्याचाही स्प्रेच्या माध्यमातून अनुभव घेता येणार असल्याचे या शास्त्रज्ञांचे मत आहे.
बेन यू आणि डेवेन सोनी यांनी शोध लावलेल्या या स्प्रेमध्ये पाणी, कॅफीन आणि अमिनो ऍसिड यांचा समावेश आहे. अमिनो ऍसिडमध्ये स्प्रेमधील घटकद्रव्ये शरीरामध्ये शोषून घेतली जाऊ शकतात. कोणत्याही व्यक्तीच्या गळ्याजवळ किंवा मनगटाजवळ स्प्रे फवारल्यामुळे संबंधित व्यक्तीला एक छोटा कप कॉफी प्यायल्यामुळे जितके कॅफीन मिळते तितके स्प्रेच्या माध्यमातून मिळू शकते. दिवसातून हा स्प्रे चार ते पाच वेळा वापरणे योग्य असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा