रेल्वेचा प्रवास हा जवळच्या किंवा दूरच्या अंतरासाठी सर्वात सोयीचा आणि स्वस्तातील मार्ग आहे. रेल्वेने एखाद्या ठिकाणी जायचे म्हटले की आरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. Paytm हे सध्या सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. आता या अॅपद्वारे रेल्वेचे तिकीट काढता येते. आतापर्यंत या अॅपद्वारे तिकीट काढल्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. मात्र आता कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. Paytm वर पीएनआर स्टेटस पाहण्यापासून तिकीट बुकींग करण्यापर्यंत सर्व कामे अगदी कमी कालावधीत होणार आहेत. त्यामुळे तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. याआधीही Paytm द्वारे रेल्वे तिकीट आरक्षित करणाऱ्या युजर्सची संख्या जास्त होती. आता शुल्क माफ केल्याने यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशाप्रकारे कोणत्याही शुल्काविना ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकींगची सुविधा उपलब्ध करुन देणारे Paytm एकमेव डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशन आहे. Paytm कंपनीचे उपाध्यक्ष अभिषेक रंजन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, तिकीट ऑनलाइन तिकीट काढल्यानंतर काही अतिरिक्त शुल्क लावले जाते, मात्र Paytm मधून तिकीटाचे आरक्षण केल्यानंतर अशाप्रकारचे कोणतेही शुल्क लागणार नाही. आतापर्यंत तिकीटाच्या एकूण रकमेवर १.८ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. पण आता या शुल्काविना प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येणार आहे. याबरोबरच एकाच मार्गावर वारंवार प्रवास करणाऱ्यांना पुन्हा तिकीट काढायचे असल्यास त्यांना सर्व माहिती परत परत भरण्याची आवश्यकता नाही असेही रंजन यांनी स्पष्ट केले.