जाड शरीरयष्टी असलेल्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या ‘बसल-लाईक’ कर्करोगाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष शास्त्रकज्ञांच्या एका चमूने काढला आहे. जाड शरीराच्या स्त्रियांमध्ये अशाप्रकारच्या ट्युमरच्या वाढीसाठी योग्यप्रकारचे वातावरण असल्याचे नॉर्थ कॅरोलायना विद्यापिठात केलेल्या संशोधनात पुढे आले आहे. हा ट्युमर मोठ्याप्रमाणावर आढळत असून, उपचारासाठी येणाऱ्या १५ ते २० टक्के स्त्रियांमध्ये अशाप्रकारचा ट्युमर अढळून येतो. यात तरूण आणि अफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांची संख्या जास्त आहे.
जाड शरीरात अशाप्रकारच्या ट्युमरच्या वाढीसाठी योग्य प्रकारचे वातावरण असल्याचा निष्कर्ष ‘युएनसी गिलिंग स्कुल ऑफ ग्लोबल पब्लिक हेल्थ’च्या सहाय्यक प्राध्यापक आणि ‘युएनसी लाईनबर्जर कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर’च्या सभासद लिझा माकोविस्की, त्यांचा शास्त्रज्ञांचा चमू आणि माकोविस्की लॅबची स्नेहा सुंदरम यांनी काढला आहे.
जाड शरीरयष्टीचे प्रमाण खूप मोठ्याप्रमाणावर पसरत असून, स्तनाच्या कर्करोगाचे हे एक कारण आहे. कर्करोगाचा हा प्रकार समजून घेऊन यावर योग्य उपाय शोधून स्तनाच्या अशाप्रकारच्या  कर्करोगाचा प्रभाव नियंत्रित करण्याचा या अभ्यासामागील आमचा उद्देश असल्याचे माकोविस्की म्हणाल्या.
आगोदरपासून जाड शरीरयष्टी असलेल्या स्त्रिया वजन कमी करून स्तनाच्या अशाप्रकारच्या कर्करोग लागणाची भिती कमी करू शकतात का? यावर आणखी संशोधन करावे लागेल असे माकोविस्की म्हणाल्या. या संशोधनाचा अहवाल ‘ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च अॅन्ड ट्रिटमेन्ट’ या नियतकालीकात प्रसिध्द करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा