आपण आपल्या वडिलधाऱ्यांकडून रात्री लवकर जेवण करण्याबाबत अनेकदा ऐकले असेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाने रात्रीचे जेवण लवकर करावे आणि वेळेत झोपावे. मात्र आता बदललेल्या जीवनशैलीमुळे सगळे वेळापत्रकच उलट सुलट झाले आहे. कामाच्या अनिश्चित वेळांमुळे कित्येकजण रात्री-अपरात्री जेवण करतात किंवा चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खातात. खाण्याच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो याबद्दल अनेकांना शंका असते. आज आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
जर काटेकोर डाएट पाळणं आपल्याला शक्य नसेल, तर अशावेळेला आपल्या जेवणाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजेच सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण आणि राशीचे जेवण यांच्यामध्ये आवश्यक अंतर ठेवणे उपयुक्त ठरते. रात्रीचे जेवण हे आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावते, कारण हा आपल्या दिवसातील शेवटचा आहार असतो. यानंतर ६ ते ८ तास आपण कोणत्याही पदार्थांचे सेवन करत नाही. म्हणूनच आपल्या आहाराचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते.
Sweets In Diabetes : आता चिंता नाही! कोणत्याही सणात मधुमेही रुग्ण खाऊ शकतात ‘या’ मिठाई
रात्रीचे जेवण आणि वजन वाढण्याची सामान्य
बऱ्याच लोकांना असं वाटतं की रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढणे किंवा इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. तथापि, तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट दिशाभूल करणारी असू शकते. खरं तर, आरोग्याच्या समस्यांचा तुम्ही कोणत्या वेळेत जेवता याहीपेक्षा तुम्ही काय जेवता याच्याशी अधिक जवळचा संबंध आहे.
अनेक अभ्यासांमधून हे समोर आले आहे की ज्या व्यक्ती रात्री ८ वाजता किंवा त्यानंतर जेवतात, त्यांच्यामध्ये जास्त कॅलरी ग्रहण करण्याची संभावना असते. यामुळे त्यांचे वजन वाढू शकते. कारण जे लोक रात्री उशिरा जेवतात, ते दिवसभरातील कॅलरी ग्रहण करण्याची त्यांची मर्यादा ओलांडतात.
Post-abortion care: गर्भपातानंतर ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या; जाणून घ्या कसा असावा तुमचा आहार
जेव्हा आपण रात्री उशिरा जेवण करतो, तेव्हा बरेचदा आपण जंक फूड खातो किंवा हळूहळू जेवतो. अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी तळलेले पदार्थ, चॉकलेट किंवा आईस्क्रीम खातात. असे कॅलरीने संपूर्ण पदार्थ रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास, ते अचानक वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच रात्रीच्या वेळी चुकूनही असे पदार्थ न झाल्याचा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञ देतात. तसेच, जोपर्यंत तुम्ही तुमच्या दैनंदिन कॅलेरीजच्या गरजा योग्य प्रमाणात पूर्ण कराल, तोपर्यंत तुम्ही रात्रीचे जेवण उशीरा करायला काही हरकत नाही. जर तुम्हाला रात्रीची भूक लागत असेल तर तुम्ही गाजर, सफरचंदाचे काप, पॉपकॉर्न, थंड द्राक्षे यासारखे पदार्थ खाऊ शकता.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला द्या.)