लठ्ठ महिलांनी ही बाब कान देवून एकणे आवश्यक आहे, कारण लठ्ठपणामुळे महिलांना कायमचा बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असल्याचे एका अभ्यासामधून समोर आले आहे. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसून, रोज थोडा व्यायाम केल्यास कायमच्या बहिरेपणाचा धोका टळू शकत असल्याचा दावा या संशोधनावर काम करणाऱ्या संशोधकांनी केला आहे.
मोठ्याप्रमाणामध्ये वाढलेली चरबी(बीएमआय) व वाढलेली कंबर यामुळे बहिरेपणाचा धोका वाढण्याची शक्यता असते. याउलट, रोज व्यायामकरणाऱ्या महिलांना बहिरेपणाची चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला  आहे.
“आपन नेहमी वार्धाक्याबरोबर बहिरेपणा येतो असेच गृहित धरून चालतो. मात्र, या संशोधनामुळे लठ्ठ महिलांमध्ये कमीवयात देखील बहिरेपणा ओढावण्याची श्यकता असल्याचे पुरावे मिळाले आहेत. मात्र, श्रमाद्वारे शरीराचे वजन व्यवस्थित नियंत्रीत केल्यास महिलांना बहिरेपणाच्या भितीचे कोणतेही कारण नाही,” असे या अभ्यासावर निबंध लिहिलेल्या लेखकांपैकी एक प्रमुख लेखक शेरॉन चुर्हान म्हणाले.
या अभ्यासा दरम्यान ६८,४२१ महिलांच्या १९८९ ते २००९ पर्यंत आरोग्यासंदर्भातील नोंदी पडताळण्यात आल्या आहेत. ब्रिंगहॅम आणि महिला रूग्णालयाने(बीडब्ल्यूएच) गोळा करण्यात आलेल्या ‘बीएमआय’च्या माहितीचे विश्लेषण केले.
या अभ्यासा दरम्यान अनेक महिलांकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून देखील माहिती गोळाकरण्यात आल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
रोज चालण्यासारख्या सोप्या व्यायामाद्वारे या अकाली बहिरेपणावर महिला मात करू शकतात अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे.      

Story img Loader