Office Bag Cleaning Hacks : ऑफिससाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग वापरतात. अनेक वेळा या बॅग्स इतक्या घाणेरड्या,मळकट होतात की त्या धुतल्यातरी स्वच्छ दिसत नाहीत. अशावेळी लोक एक तर दुसरी बॅग वापरतात किंवा नवीन बॅग विकत घेतात. यात अनेकदा बॅगमध्ये टिफिनमधील तेल सांडते, अशावेळी बॅग लगेच स्वच्छ करणे काही जमत नाही, तसेच बॅग लगेच सुकत नाहीत म्हणून त्या पुसून स्वच्छ केल्या जातात. पण, अशा बॅगमधून काही दिवसांनी कुबट, घाणेरडा वास येऊ लागतो, जो काही वेळा फार असह्य होतो. त्यामुळे आम्ही खास तुमच्यासाठी ऑफिस बॅग काही मिनिटांत स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ या सोप्या ट्रिक्स..
ऑफिस बॅग कशी स्वच्छ करायची?
रोज ऑफिसमध्ये घाणेरडी, मळकटलेली बॅग घेऊन जायला लाज वाटते, त्यामुळे महिन्यातून एकदा तरी बॅग स्वच्छ केली पाहिजे. पण, अनेकांकडे तितकासा वेळ नसतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला बॅग पाण्यात न भिजवता स्वच्छ करण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमची बॅग सहज स्वच्छ करू शकता.
व्हिनेगरने करा बॅग स्वच्छ
बॅग साफ करण्यापूर्वी तुम्ही त्यातील सर्व वस्तू आधी बाहेर काढून बॅग रिकामी करा. तसेच आतील सर्व कप्पे तपासा, जेणेकरून आत काहीही शिल्लक राहणार नाही. आता एका स्वच्छ कापडाच्या मदतीने बॅग जिथे घाण झाली आहे, तिथे व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही स्वच्छ करू शकता. यावेळी तुम्ही कापडाच्या ऐवजी स्पंजदेखील वापरू शकता. बॅग बाहेरून तसेच आतून स्वच्छ करा. अनेकदा टिफिनमधील तेल बॅगमध्ये सांडते, ज्यामुळे बॅगमध्ये काळी, पांढरी बुरशी तयार होते. अशा ठिकाणीदेखील व्हिनेगरचा वापर करून बॅग स्वच्छ करू शकता.
Read More Trending News : ऐ हालो…! मुंबई लोकल ट्रेनच्या भरगर्दीत महिलांचा गरबा; Video पाहून युजर्स म्हणाले, “जरा विरार…”
बॅग स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर नेमका कसा करायचा?
मळकटलेली बॅग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एका भांड्यात अर्धा कप व्हिनेगर घ्या, त्यात दोन चमचे बेकिंग सोडा, एक कप पाणी मिक्स करा, यानंतर तयार मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा. आता स्प्रे बाटलीतील लिक्विड बॅग ज्या ठिकाणी घाण झाली आहे तिथे स्प्रे करा.यानंतर कोरड्या कापडाने किंवा हाताने बॅग रगडा आणि नंतर पुसून पूर्णपणे स्वच्छ करा.
‘या’ ट्रिक्सचाही करू शकता वापर
१) जर तुमची ऑफिस बॅग नॉन वॉशेबल असेल तर ती न धुता त्यातील दुर्गंधी घालवण्यासाठी पूर्णपणे रिकामी करा आणि काही तास कडक उन्हात ठेवा, यामुळे बॅगमधील दुर्गंधी काही प्रमाणात कमी होईल.
२) बॅगमधील कुबट वास घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. यासाठी बॅगमध्ये बेकिंग सोडा शिंपडा आणि बॅगची चेन लावून ती पॅक करा, ही बॅग चार ते पाच तास अशीच राहू द्या, अशाने बॅगमधील दुर्गंधी बेकिंग सोडा शोषून घेईल आणि बॅगमधील कुबट वास दूर होईल.