आपल घर सुंदर दिसावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपण छान सजावट करतो. घराला शोभेल असे सुंदर पडदे वापरतो. पडदे घराचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. परंतु काही काळानंतर त्यांना बदलण्याची गरज पडचे. कारण कधी-कधी ते फॅशनबाहेर जातात किंवा फाटायला लागतात. मग जुन्या पडद्यांचे करायचे काय? याचा विचार करणे फार कठीण आहे. बरेच लोक ते कचर्‍यात फेकत असले तरी काहीजण ते इतरांना दान करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण तुम्हाला माहितीये का तुम्ही जुने पडते वापरून कित्येक नव्या गोष्टी तयार करू शकता आणि पैसे देखील वाचवू शकता. जर तुम्हाला ते माहित नसेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. येथे आम्ही तुम्हाला काही सोप्या गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्यामुळे पडदे पुन्हा वापरले जाऊ शकतात.

हेही वाचा – रोज पाणी टाकूनही तुळस सुकतेय? मग ‘हे’ उपाय करा, सुकलेलं तुळशीचं रोपटं देखील होईल हिरवेगार

उशीचे कव्हर तयार करा

पडदे जुने झाल्यास त्याचा पुन्हा वापर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते कापून त्याचे उशीचे कव्हर तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला उशीच्या आकारानुसार पडदे कापावे लागतील. मग त्याला तिन्ही बाजूने शिलाई मारा आणि एका बाजूने चेन किंवा बटन लावा. तुमच्या कुशन आणि उशीसाठी नवा कव्हर सेट तयार आहे. तुम्हाला त्याचा रंग रुप बदलण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनुसार कापून त्यावर चिटवू शकता.

पडद्यांपासून ॲप्रन तयार करा

जुन्या पडद्यांपासून तुम्ही स्वतःला एप्रन बनवू शकता. ज्याचा वापर स्वयंपाक करताना किंवा घर साफ करताना करता येतो. तुम्हाला फक्त रॉडच्या गोल आकारातून एक रिबन किंवा स्ट्रिंग सरकवायचे आहे जे तुम्ही तुमच्या गळ्यात बांधू शकता आणि तुमचे एप्रन तयार आहे. गरजेनुसार तुम्ही त्यात बदलही करू शकता.

हेही वाचा – कंबरेपर्यंत केस वाढवायचेत? स्वयंपाकघरात असलेल्या फक्त ‘या’ ३ गोष्टी वापरा, केस होतील लांब

एरिया रग बनवा आणि वापरा

जर तुमचे जुने पडदे खोलीच्या रंगाशी किंवा पॅटर्नशी जुळत असतील तर तुम्ही त्यातून एरिया रग बनवू शकता. पडदे तुमच्या हव्या त्या आकारात कापून घ्या, नंतर त्यावर नॉन-स्लिप बॅकिंग चिकटवा किंवा शिवून घ्या. जर पडदे कॉटनचे असतील तर तर ते रंग खूप चांगला दिसतात.

कापडी नॅपकिन्स बनवू शकतात

तुम्ही जुन्या पडद्यातून जुळणाऱ्या नॅपकिन्स बनवू शकता. जरी पडदा कॉटनचा असेल तर उत्तम. हे बनवायलाही खूप सोपे आहे. यासाठी पडदे चौकोनी आकारात कापून कडांना हेम किंवा पॉईपिंग करून घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old torn curtains are not a waste if you want to save money do this and reuse them learn simple tips snk
Show comments