Coronavirus Omicron in India: ओमिक्रॉनची दहशत अजूनही संपलेली नाही आहे. करोनाव्हायरसच्या चौथ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. चीननंतर आता भारतातही करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोविड -१९ च्या केसेसमध्ये Omicron चा नवीन XBB प्रकाराची भारतात सर्वाधिक प्रकरणे आढळत आहेत आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील जवळपास ९ राज्यांमध्ये याची प्रकरणे दिसली आहेत.
भारतात Omicron XBB वेरिएंट केसेस कुठे मिळाले आहेत?
Omicron सतत त्याचे स्वरूप बदलत आहे आणि त्याचा नवीन प्रकार XBB वेगाने पसरत आहे. TOI च्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात XBB प्रकाराची ३६ प्रकरणे आढळून आली. WHO नुसार, Omicron चे हे प्रकार ३ ते ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत जवळपास ३५ देशांमध्ये पसरले आहे.
( हे ही वाचा: Uric Acid: युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी वर्षभर उपलब्ध असलेल्या ‘या’ ४ भाज्या ठरतील वरदान, वेळीच जाणून घ्या)
Omicron XBB प्रकार काय आहे?
WHO च्या मते, Omicron XBB हे Omicron BA.2.75 (Omicron BA.2.75) आणि Omicron BA.2.10.1 उप-प्रकार (Omicron BA.2.10.1) यांचा समावेश असलेला एक हाइब्रीड प्रकार आहे. ओमिक्रॉन एक्सबीबी प्रकाराचा पहिला केस ऑगस्ट २०२२ मध्ये सिंगापूरमध्ये आढळून आला होता आणि आता त्याचा जागतिक प्रसार दर १.३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Omicron च्या नवीन प्रकारापासून कसा बचाव करायचा?
Omicron च्या नवीन प्रकारापासून बचाव करायचा सोपा उपाय म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे. करोनाच्या सुरुवातीपासूनच तज्ज्ञ शरीराची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याचा सल्ला देत आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही व्यायाम करा आणि आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा.
( हे ही वाचा: Multi-cancer Early Detection Tests: आता फक्त एका टेस्टने करता येईल सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी; जाणून घ्या कसे)
ग्रीन टी
ग्रीन टी प्यायल्याने अँटिऑक्सिडंट्स मिळतात. तज्ञ या घटकांना रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असल्याचे म्हणतात. आहारात ग्रीन टीचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यात epigallocatechin gallate असते, जे अँटीएंजिओजेनिक आणि अँटी-ट्यूमर एजंट म्हणून कार्य करते. ज्यामुळे तुम्ही कमी आजारी पडता.
फर्मेंटेड फूड
फर्मेंटेड फूड काय आहेत? फर्मेंटेड फूड म्हणजे ते पदार्थ जे प्रक्रियेद्वारे तयार केले जातात. दही हे याचे उत्तम उदाहरण आहे, ज्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे संसर्गाशी लढतात. Omicron XBB प्रकार टाळण्यासाठी, तुम्ही न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात दहीचा समावेश करू शकता. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील सुधारते.
( हे ही वाचा: चुकीच्या पद्धतीने उपवास करणे आरोग्यास ठरू शकते हानिकारक; आयुर्वेदात याबाबत सांगितलेली योग्य पद्धत नक्की जाणून घ्या)
हंगामी फळे आणि भाज्या
हिवाळा सुरू झाला आहे आणि थंड हंगामात उपलब्ध हिवाळी फळे आणि भाज्यांचे सेवन सुरू करा. हंगामी फळे आणि भाज्यांमध्ये असे गुणधर्म असतात जे त्या विशिष्ट हंगामात होणाऱ्या संसर्ग आणि जंतूंपासून संरक्षण करतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. हिवाळ्यात तुम्ही हिरव्या भाज्या, गाजर, आले, पेरू, किवी, ब्रोकोली, संत्री, पालक, मासे, शिमला मिरची इत्यादी खाऊ शकता.
नट्स आणि बिया
नट्स आणि बियांमध्ये भरपूर पोषण असते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. दररोज मूठभर ड्रायफ्रूट्स आणि बिया खाऊन तुम्ही ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारापासून स्वतःचे संरक्षण करू शकता . यासाठी बदाम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, खजूर, अक्रोड इत्यादींचे सेवन करावे.
( हे ही वाचा: शुगर २००-४०० mg/dl असल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; जाणून घ्या या पातळीवर Sugar कशी नियंत्रित करावी)
यासोबत करोनाव्हायरसची नवीन लाट थांबवण्यासाठी कोविडची लस घेणे, मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, खोकताना आणि शिंकताना रुमाल वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे.