संपूर्ण देशभरात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या शिक्षकांकरिता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तर काही ठिकाणी या दिवशी शिक्षकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात. या दिवशी अनेक विद्यार्थी शाळेत शिक्षकांची भूमिका बजावतात आणि शिक्षक दिन साजरा करतात. विद्यार्थीत्यांच्या शिक्षकांना विशेषतः शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा पत्र घरी सहज बनवू शकतात तसेच काही भेटवस्तू देखील भेट करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.
आपल्या शिक्षकांसाठी स्वतःच्या हाताने तयार करा कार्ड
चांगल्या-वाईट गोष्टींचा फरक समजवून योग्य दिशा दाखवणारे, सक्षम बनविणारे, आपल्याला घडवणारे शिक्षक हे नेहमीच आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाची आणि मोठी भूमिका बजावतात. यामुळे तुम्ही या दिवशी आपल्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी स्वतःच्या हाताने थँक्स कार्ड बनवू शकता. हे कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त कार्डशीट, रंग, पेन्सिल आणि कात्रीचा वापर करावा लागेल. तुमच्या कलेचा वापर करून तुम्ही एक अत्यंत सुंदर थँक्स कार्ड बनवून आपल्याला शिक्षकांना खुश करू शकता.
शुभेच्छा पत्र
आपल्या विदयार्थ्याने स्वत:च्या हाताने बनवलेलं शुभेच्छा पत्र प्रत्येक शिक्षकांसाठी नेहमीच खास असतात. तुम्ही क्रिएटिव्ह किंवा चित्रकलेत निपुण असाल तर घरच्या घरीच एक सुंदर असं शुभेच्छा पत्र बनवू शकता. त्याचप्रमाणे, शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्ही एक छान पत्र लिहून देखील तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा देऊ शकता. आजकाल बाजारातही तयार शुभेच्छा पत्रं मिळतात. त्यामध्ये सुंदर असा संदेश असतोच. पण स्वतःच्या हाताने बनविलेली एखादी वस्तू भेट देण्याचं समाधान काही वेगळंच असतं.
झाडांची रोपं
तुम्ही तुमच्या शिक्षकांना तुमच्या आवडत्या झाडाचं एखादं रोपं भेट म्हणून देऊ शकता. ह्यामध्ये अनेक सुंदर फुलझाडं, इनडोअर प्लांट्ससह विविध पर्याय तुम्ही ट्राय करू शकता.
कॉफी मग
तुम्ही तुमच्या शिक्षकांना कॉफी मग देखील देऊ शकता. खरंतर ही सध्याची ट्रेंडमध्ये असलेली आणि कुणालाही सहज आवडणारी एक भेट वस्तू ठरत आहे. या कॉफी मगवर तुम्ही शिक्षकांचे खास फोटो, त्यांचं नाव किंवा सुंदर असा मेसेज डिझाईन करून दिलंत तर ही खूपच सुंदर भेटवस्तू ठरेल.
पुस्तक
शिक्षकांसाठी पुस्तकांपेक्षा जवळचं आणखी काय असणारं? तेव्हा तुम्ही त्यांच्या पसंतीची एखादी कादंबरी, एखादं पुस्तकं भेट म्हणून देऊ शकता. मात्र, नेमकं कोणतं पुस्तक निवडावं ह्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षकांची आवड माहिती असायला हवी.