जगभरात ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा विशेष दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना आरोग्याबाबत जागरूक करणे हा आहे. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम ‘आपला ग्रह, आपले आरोग्य’ आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल रोजी झाली. डब्ल्यूएचओच्या स्थापना दिनानिमित्त जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. यानंतर, १९५० मध्ये प्रथमच, डब्ल्यूएचओशी संबंधित सर्व देशांनी जागतिक आरोग्य दिन साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दिवशी, लोक एकमेकांना आरोग्याचे महत्त्व समजण्यासाठी जागतिक आरोग्य दिनाशी संबंधित शुभेच्छा संदेश पाठवतात. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना हे आरोग्य-संबंधित प्रेरक संदेश पाठवू शकता.

निरोगी आरोग्याशिवाय जगातील सर्व सुख व्यर्थ आहेत.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

आजच्या जागतिक आरोग्य दिनी असा एक संकल्प करा, ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर स्वस्थ राहाल.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

आपण सर्व एकत्र येऊ,
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या समाजामध्ये आरोग्याची जनजागृती करू.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

जीवन खूपच अनमोल आहे,
यात निरोगी आरोग्याचा मोठा रोल आहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

जे घेतात आपल्या आरोग्याची काळजी, त्यांना सतावत नाही इतर कोणतीही चिंता.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

निरोगी शरीर, हे उत्तम जीवनाचे लक्षण
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

आधी घ्या आरोग्याची काळजी, मग करा कामं सगळी
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

योगा आणि व्यायाम करा, स्वतःला निरोगी बनवा.
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of world heath day send this messages to your loved ones pvp