हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यापासूनच विविध सणांची सुरुवात होते. या महिन्यात मांसाहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. म्हणूनच श्रावण महिना सुरु होण्याआधी आपल्याकडे मांसाहारी जेवणावर ताव मारला जातो. २९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. याचनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मटणाच्या खास पाककृती. या पाककृती बनवण्यासाठी अतिशय सोप्या असल्या तरीही त्या अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…
मटण चॉप्स
साहित्य
- मटण चॉप्स – ५०० ग्रॅम
- दही – २ चमचे
- आले आणि लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
- लिंबाचा रस – १ टेबलस्पून
- मीठ- १/२ टीस्पून
- लाल तिखट – १/२ टीस्पून
- धणे पावडर – १/२ टीस्पून
- गरम मसाला – १/२ टीस्पून
- काळी मिरी – १/२ टीस्पून भाजलेली आणि क्रश केलेली
- जिरे – १/२ टीस्पून भाजलेले आणि क्रश केलेले
- दालचिनी – १/८ टीस्पून
- तेल – २-३ चमचे
पाककृती
- एका भांड्यात दही, आले आणि लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट, धणे, गरम मसाला, मिरपूड, जिरे आणि दालचिनी घाला. चांगले मिसळा.
- तयार झालेल्या मिश्रणामध्ये मटण चॉप्स घाला आणि व्यवस्थितपणे मिक्स करा. पुढे या कमीतकमी ३ तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे. बेकिंग ट्रेमध्ये किंवा पसरट भांड्यात ठेवा.
- नंतर ह्या मिश्रणावर थोडसं तेलही घाला. आणि. फॉइलने झाकून ठेवा. पुढे १८० डिग्री सेल्सिअसवर २०-२५ मिनिटे प्रीहेटेड ओव्हनमध्ये बेक करावे. ओव्हनमधून बाहेर काढून त्यावरची फॉइल काढावी आणि चॉप्सची बाजू बदलावी.
- पुन्हा फॉइल झाकून पुढील १०-१५ मिनिटे बेक करावे. मध्ये मध्ये बाजू बदला. अशाप्रकारे चॉप्सतयार आहेत. हे चॉप्स शेजवान चटणी किंवा अन्य कोणत्याही चटणी सोबत सर्व्ह करू शकता.
Chicken Recipes : यंदाच्या गटारीला घरच्या घरी बनवा ‘या’ चमचमीत रेसिपी
हिरवं मटण
साहित्य
- १ किलो मटण
- अर्धा किलो कांदे
- आलं (४ ते ५ छोटे तुकडे)
- एका लसणीच्या पाकळ्या
- ७ ते ८ हिरव्या मिरच्या
- १ वाटी चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा खसखस
- ५ लवंगा
- ८ काळी मिरी
- ५ दालचिनीचे तुकडे
- २ चमचे बडीशेप
- जायफळाचा तुकडा
- एक वाटी तूप
- फोडणीसाठी दोन लवंग
- दालचिनीचे दोन तुकडे
- २ वेलची
- १ वाटी ओल्या खोबऱ्याचा रस
पाककृती
- तूप तापवून त्यात लवंग, वेलची, दालचिनी घालून कांदा घालावा.
- वाटलेल्या मसाल्याची गोळी मटणाला लावून ठेवावी.
- कांदा चांगला परतला गेल्यानंतर त्यात मटण घालून परतावे.
- नंतर थोडी हळद, मीठ आणि पाणी घालून शिजवावे.
- शेवटी खोबऱ्याचा रस घालावा.
- मटणाएवढाच अंदाजे रस ठेवावा
- कूकरमध्ये शिजवायचे असेल, तर ३ शिट्ट्या कराव्यात.
कधी आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार? जाणून घ्या उपासनेची योग्य विधी
मटण हंडी
साहित्य
- १ किलो मटणाचे तुकडे
- ७ किसलेले कांदे
- २ इंच आल्याची पेस्ट
- मीठ
- अर्धा चमचा साखर
- ४ हिरव्या मिरच्या
- १ चमचा कोथिंबीर
- २ कप दही
- १ लसणाची पेस्ट
- अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी
- दीड चमचा लाल मिरची
- १ चमचा हळद
- २ बारीक केलेले टोमॅटो
- १ चमचा गरम मसाला
पाककृती
- प्रथम मटणाला अर्धी आलं-लसूण पेस्ट व दही लावून दोन तास ठेवा.
- एका मातीच्या वा कॉपर बॉटमच्या हंडीत २ चमचे तेल गरम करून त्यात कांदे लाल होईस्तोवर परता.
- त्यात लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला घालून परता.
- त्यात उरलेली आले-लसूण पेस्ट, बारीक केलेले टोमॅटो, मटण व मीठ घालून परता.
- झाकण लावून झाकणावर पाणी ठेवून मटण शिजू द्या. शेवटी साखर घालून ढवळा, वरून कोथिंबीर पेरा.
- गरमागरम हंडी मटण जिरा राईस वा रोटीसोबत सर्व्ह करा.